अनधिकृत ढाबा मुंबई महापालिकेकडून जमीनदोस्त

अनधिकृत ढाबा मुंबई महापालिकेकडून जमीनदोस्त

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव, मोजोज ब्रेस्टो येथील अग्नितांडवात 14 निष्पापांचे बळी आणि अनेक लोक जखमी झाल्यानंतर मुंबई महापालिकेची हॉटेल्स आणि पबच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईस शनिवारपासून सुरवात झाली.

हॉटेल आणि पबच्या अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणाऱ्या पालिकेने शनिवारी धडक कारवाई करीत ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकली. मात्र, यापूर्वीच पालिकेने ही कारवाई  केली असती तर कदाचित हे निष्पाप जीव वाचू शकले असते, अशी प्रतिक्रिया मुंबईकर संतप्तपणे व्यक्त करीत आहेत. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. यानंतर येथील अनधिकृत बांधकाम आणि सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. महापालिकेवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने तातडीने शुक्रवारी कमला मिल्स कंपाऊंडमधील चार हॉटेल्सवर तोडकामाची कारवाई केली. शनिवारी सकाळपासूनच रघुवंशी मिल आणि कमला मिल परिसरातील अनधिकृतपणे बांधकाम केलल्या हॉटेल आणि ढाब्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

तसेच हॉटेल्स आणि हॉटेलचे शेडही तोडण्यात आले. संध्याकाळपर्यत यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक यासाठी तयार करण्यात आलेले आहे.
मनपा वार्ड एफ साऊथचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई
यांनीही धडक कार्वाई करीत 39 व्यावसायिक हॉटेल्स जागांचे निरीक्षण करुन 36 गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. तर 19 जणांना आय.आर.नोटीस बजावली आहे.

14 शेगड्या जप्त करत 6 शेड तोडून टाकल्या आहेत. ही कारवाई मोठ्या प्रमाणात हॉटेल्सवर करण्यात आलेली आहे. यात डोमिनोज पिझ्झा(5 गॅस सिलेंडर), फासुस(3), आर्फ़ा हॉटेल्स(4), कैलास लस्सी(2 सिलेंडर अधिक एक बर्नर), कॅफे हसन, जनता हॉटेल, बिस्मिल्लाह हॉटेल यांचेसह शिवडी क्रॉस रोड येथील छोटी मोठी हॉटेल्सवर सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली. 

त्याचप्रमाणे एफ नार्थ वार्ड येथेही कारवाई करण्यात आली.17 ठिकाणी कारवाई करत 27 सिलिंडर, 40 शेगड्या जप्त करण्यात आल्या असून, 4 शेड्स तोडण्यात आले आहेत. अय्यपा इडली सेंटर, आर्या भवन, भाया स्वीट, गुरुनानक स्वीट, केरला हॉटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईची सुरवात एफ साऊथमधील गोखले सोसायटी लेन येथील अनधिकृत शेड उध्वस्त करीत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com