महाराष्ट्रात सिंचनात दोन वर्षांत होणार चमत्कार!

शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

संजय मिस्कीन 
मुंबई : महाराष्ट्रात सिंचनाच्या क्षेत्रात असलेल्या अधोगतीवर मात करून आगामी दोन वर्षात चमत्कार वाटेल अशी प्रगती होणार असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज केला. कालवा समितीच्या बैठकीनंतर आयोजित
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्याचे सिंचन क्षेत्र 16.1 टक्‍के इतके सिमीत राहीलेले असताना मागील दोन वर्षांत यामधे वाढ होवून ते 18 टक्‍क्यांच्या पुढे गेल्याची माहीती त्यांनी दिली. मात्र, ही आकडेवारी अद्‌याप अधिकृत नसल्याचे स्पष्ट करत 2019 मध्ये
राज्यात चमत्कार वाटेल असे आकडे समोर येतील, असे ते म्हणाले. 

मागील दोन वर्षांत सात ते साडेसात लाख हेक्‍टरहून अधिक सिंचन क्षेत्र वाढल्याची माहीती देताना महाजन म्हणाले की, हे क्षेत्र 32 लाख हेक्‍टरवरून 40 लाख हेक्‍टर पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्‍यक त्या सर्व बाबींची
युध्दस्तरावर पुर्तता होत आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या 107 प्रकल्पांना 12 हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकल्पांची सर्व अपुर्ण कामे दोन वर्षात पुर्ण होणार आहेत. त्यासोबतच
आतापर्यंत राज्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवणाऱ्या लोखंडी फळ्या नव्हत्या. त्यामुळे, सरकारने 1200 बंधाऱ्यांसाठी 53 हजार फळ्या तयार करून बसवल्याने पाण्याचा प्रचंड मोठा साठा राज्यभरात झाला आहे. 
मागील दोन वर्षांत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत राज्यातले 26 प्रकल्प घेण्यात आले होते. यासाठी राज्याने नाबार्डकडून 12 हजार कोटी रूपयांचे कर्ज काढले असून केंद्राने 2800 कोटी रूपयांचा हिस्सा दिला आहे.
हे प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असून त्यातून प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ लवकरच मिळणार आहे. राज्यात एकूण सिंचन क्षमता 49 लाख हेक्‍टर एवढी असून, यापैकी 40 लाख प्रत्यक्ष सिंचनाचे उद्‌दीष्ट ठेवण्यात आल्याची माहीती त्यांनी
यावेळी दिली. 

Web Title: Marathi news mumbai news irrigation in maharashtra girish mahajan