अनाथ मुलाच्या लग्नाचे जसोदाबेन यांना निमंत्रण 

हर्षदा परब
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मुंबईत एका लग्न समारंभाला येण्याची शक्‍यता आहे. त्यांची मैत्रीण संगीता गौडा यांनी ही माहिती दिली. अनाथाश्रमात वाढलेल्या एका मुलाच्या लग्नाला त्या उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

जसोदाबेन यांनी मुंबईला येण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती बाबा पीटर पॉल ऊर्फ ब्रदर पीटर पॉल यांनी दिली. जसोदाबेन यांना त्यांच्या घरात कैद केल्याबद्दल पीटर पॉल यांनी गेल्या वर्षी उपोषण केले होते. जसोदाबेन यांना त्यानंतर बाहेर फिरण्याची परवानगी मिळाली आणि त्या भारतातील काही ठिकाणी फिरून आल्या, असे पॉल यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 15 वेळा ते जसोदाबेन यांना भेटले आहेत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या संगीता गेडाम यांना जसोदाबेन यांनी बहीण मानल्याचे समजते. 

"समरितन मिशन"च्या मुंबईतील विक्रोळी येथील शाखेत वाढलेल्या मुलाचा विवाह 28 ऑक्‍टोबरला होणार आहे. हा मुलगा वयाच्या चौथ्या वर्षी मिशनच्या आश्रमात आला होता. दादर रेल्वेस्थानकावर त्याच्या आईने त्याला सोडून दिले होते. तिथे तो भीक मागत असे. तो बी. कॉम असून आता तो एका खासगी क्‍लासमध्ये शिक्षक आहे. 

Web Title: Marathi News Mumbai News Jasodaben in Mumbai soon