डोंबिवलीकरांनी अनुभवला कबड्डीचा थरार

संजीत वायंगणकर
रविवार, 4 मार्च 2018

या स्पर्धेत सुमारे 65 संघ सहभागी झाले असून हे सामने दोन दिवस खेळवले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, वसई, कल्याण, चाळीसगाव, सांगली, मुरूड-जंजिरा, पालघर, नेरळ, रोहा, बदलापूर, आदी ठिकाणांहून नावाजलेले संघ उतरले आहेत.

डोंबिवली : लाल मातीच्या मैदानावरील अस्सल मराठमोळ्या कब्बडी खेळातील नामवंत संघातील खेळाडूंचे नैपुण्य याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळाली आहे निमित्त आहे, स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि यश चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या दोन दिवसांच्या कबड्डी सामन्यांचे.

नगरसेवक नितीन पाटील आणि माजी नगसेविका रंजना पाटील या दाम्पत्याच्या विद्यमाने 65 किलो वजनी गटात ही स्पर्धा रंगली आहे. राष्ट्रीय कबड्डीपटू निलेश शिंदे, गिरीश ईरनाक यांच्या हस्ते या सामान्यांचा प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी माजी नगरसेवक रवी पाटील, नगसेवक विशू पेडणेकर, भाजपाच्या जिल्हा मोर्चा अध्यक्षा उज्वला दुसाने, पूर्व मंडळ शहराध्यक्षा पूनम पाटील ,संजीव बिडवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कबड्डी सामन्यांची सुरूवात स्थानिक महिला कब्बडी संघांच्या सामन्याने झाली. यावेळी आयोजक नितीन पाटील म्हणाले, या कबड्डी सामन्यांच्या मागचा उद्देश म्हणजे मराठी मातीतला हा खेळ आहे. कबड्डी हा मैदानी खेळ सातासमुद्रापार पोहोचविला आहे. त्यामुळेच कबड्डी खेळाला सुगीचे दिवस दिसून येत आहेत. असा हा मातीतला खेळ आपल्या तरूण मंडळींमध्ये चांगल्या प्रकारे रुजावा या उद्देशाने हे सामने भरवले आहेत.

या स्पर्धेत सुमारे 65 संघ सहभागी झाले असून हे सामने दोन दिवस खेळवले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, वसई, कल्याण, चाळीसगाव, सांगली, मुरूड-जंजिरा, पालघर, नेरळ, रोहा, बदलापूर, आदी ठिकाणांहून नावाजलेले संघ उतरले आहेत. पूर्वेकडे आयरे रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात कबड्डी सामान्यांसाठी लाल मातीच्या मैदानाची उभारणी केली आहे. य स्पर्धेत एकाच वेळी दोन सामाने खेळविण्यात येणार आहेत.प्रो कब्बडी गाजविणारे , कब्बडीपटू निशांत देवाडिगा,काशिलिंग अडके ,बाजीराव होडगे, प्रताप सावंत,नितीन मदने या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Marathi news Mumbai news kabbadi compitiition