आपली राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न - मंदार हळबे

सुचिता करमरकर
शनिवार, 3 मार्च 2018

कल्याण : अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आपण आवाज उठवला असल्याने आपल्या विरुद्ध खोट्या तक्रारी करुन आपली राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कल्याण डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला आहे. पालिकेच्या इ आणि जे प्रभागांचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगारे यांनी हळबे तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

भांगांरे यांचे आरोप दोन्ही नगरसेवकांनी फेटाळले आहेत. सत्तावीस गावातील अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणी आपण आवाज उठवत असल्याने आपल्या विरुद्ध खोट्या तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असा खुलासा त्यांनी केला. अतिरिक्त आयुक्त संजय घरत तसेच उपायुक्त सुरेश या पवार यांनी पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले असून बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप हळबे यांनी केला आहे. पालिका क्षेत्रात सध्या एक हजाराहून अधिक अनधिकृत बांधकामे सुरु आहेत त्यासाठी या दोघांना जबाबदार ठरवून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी हळबे यांनी केली आहे. 

संजय घरत यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असल्याने यावर प्रतिक्रिया देण्यास पालिका आयुक्त पी वेलारसू यांनी नकार दिला. मात्र दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सुंदर या पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून पंधरा दिवसांत त्यांचे उत्तर येईल त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ही वेलारसू यांनी सांगितले.

Web Title: Marathi news mumbai news kalyan dombivali municipal corporation