डोंबिवली - विकास कामांच्या आड येणारे शुक्राचार्य शोधा

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विकास कामांच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य शोधा आणि कठोर कारवाई करा अशी मागणी माजी नगारसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी.वेलरासू यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा संदर्भ देऊन, पाच वर्षांपेक्षा आधिक कालावधी उलटला तरीही डोंबिवलीतील ही कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत त्यामुळे करदात्या डोंबिवलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो तरी आपण स्वतः या सर्व कामांची पहाणी करावी व विलंबास जबाबदार आधिकारी वर्गावर कडक कारवाई करावी. अशी मागणी थरवळ यांनी केली आहे.

विकासकामांची निविदा तयार करतानाच काही भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने, शासनाचा निधी परत जाईल अशी भीती दाखवून महासभा व स्थायीची परवानगी घेतात आणि अनेक त्रुटी ठेवतात व ना हरकत, परवानग्या न घेता कामे घाईघाईने सुरु करतात. त्यामुळे विहीत कालमर्यादेपेक्षा कामे लांबतात. यातून निविदा दरापेक्षा अधिक दरवाढ देऊन संगनमताने मलिदा खातात असा आरोप करुन अशा झारीतील शुक्राचार्यांवर कारवाईची मागणी थरवळ यांनी केली आहे. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत सखोल चौकशी करण्याचे तसेच यापुढे कोणत्याही ठेकेदारास विलंबकामासाठी दरवाढ न देण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

Web Title: Marathi news mumbai news kalyan dombivali municipal corporation