रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले!

रविंद्र खरात
मंगळवार, 4 जुलै 2017

कल्याण : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी , मेल गाडी इंजिन थांबने , मेल गाडीचे इंजिन घसरले या घटना वाढल्याने अनेक तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान नागरिक राहतात. जनावरे नाही, रेल्वे प्रशासन अमानुष पणे का वागते असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे . 

कल्याण : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी , मेल गाडी इंजिन थांबने , मेल गाडीचे इंजिन घसरले या घटना वाढल्याने अनेक तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान नागरिक राहतात. जनावरे नाही, रेल्वे प्रशासन अमानुष पणे का वागते असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे . 

पूर्वी नोकरी आणि व्यवसाय आणि शिक्षणासाठी कसारापासून कल्याण आणि पुढील स्थानकाकडे लोक जात असे. मात्र आसनगांव पुढे आटगांव भागात औद्योगिक वसाहत , अभियांञिक महाविद्यालय,शाळेवर जाणारे शिक्षक ,पोतदार ,संघवी हाऊसिंग काम्पलेक्स , खर्डी येथे दोन मोठ्या नामांकित कंपन्या ,अजमेरा गृहसंकुल , कसारा येथे पालिटेक्निक महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या अत्यावश्यक सेवेला कल्याण ठाणे भागातून जाणारा कर्मचारी  वर्ग शिवाय कसारा भागातून मुंबईकडे दैनंदिन प्रवास करणारे पन्नास हजाराच्या वरील किमान प्रवासी जे दुध ,भाजीपाला , मासळी विक्रेते ,महाविद्यालयीन मुले मुली ठाणे मुंबईला ये-जा करतात.

दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे. रेल्वे समांतर रस्ता खर्चिक असल्याने रेल्वे एकमेव पर्याय असल्याने प्रवासी लोकल आणि मेल गाडीने प्रवास करतात. प्रवासी संख्या वाढली, उपन्न वाढले; मात्र रेल्वे प्रशासन ने कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी वर्गाची उपेक्षाच केली आहे . 

मागील काही दिवसात घडलेल्या घटना 

25 जून : टिटवाळा स्थानकात मुसळधार पावसाने रूळांमध्ये पाणी भरले ..कल्याण कसारा वाहतुक चार तास बंद होती.

27 जून : खर्डी -कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल. सकाळी 11.45... वाहतूक 2 वाजून 5 मिनिटाला सुरु झाली.

27 जून : वासिंद -आसनगांव दरम्यान डाऊन मार्गावर कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनात तांञिक बिघाड. दुपारी 3 वाजून 30. सायंकाळी 5 पर्यंत अप आणि डाऊनची वाहतूक ठप्प होती 

28 जून : आसनगांव पोल नं 84 येथे मालगाडीच्या इंजिनात बिघाड. सकाळी  11.22 मि.,.नवीन इंजिन आणल्यावर वाहतूक दुपारी  2 वाजून .17 वाजता सुरू.

30  जून : कल्याण येथे क्राॅसिंगला मंगला एक्सप्रेसचे इंजिन दुपारी 2 वाजून 20 रूळावरून घसरले. ते 4 वाजून 17 वाजता कल्याण रेल्वे स्थानकामध्ये रवाना. यावेळीही कसारा आणि कल्याण दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती . 

या घटनांमुळे प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून आता तरी रेल्वे प्रशासन जागे होणार का असा सवाल केला जात आहे . 

वेळ जातो .... वनवास कधी संपणार ...
कसाराहून मुंबईच्या दिशेने रोज मेल गाडी आणि लोकल धावते. पण टिटवाळा गेत क्रॉसिंग, आंबिवली-शहाड गेट क्रॉसिंग, शहाड-कल्याण सिग्नलवर लोकल कधी थांबते, तर कधी कल्याण रेल्वे स्थानकामध्ये फलाटामध्ये फलाट खाली नसल्यामुळे अर्धा तास गाडी उभी राहते. त्यामुळे रोज प्रवाशांना कसारा ते कल्याण ही अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येक कसारा लोकलमधील अंतर दीड तासाचे आहे. कसारा विभाग व नाशिक जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांचे हाल होतात. 'हा वनवास संपणार कधी?' असा प्रश्न कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिन श्याम उबाळे यांनी केला आहे.

Web Title: marathi news mumbai news kalyan kasara local Central Railway