कल्याण - केडीएमटी बस थांब्यावर अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य

रविंद्र खरात 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बस मधील घाणीच्या साम्राज्याने प्रवासी त्रस्त असताना आता कल्याण मधील अनेक केडीएमटी बस स्थानकावर दुचाकी, कार, खासगी बस, जीप, आदींनी पार्किंग झोन बनविले असून बस मध्ये प्रवाश्यांनी कसे चढायचे तर अनेक बस थांब्यावर घाणीचे साम्राज्य असून याबाबत केडीएमटी प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने आगामी 8 दिवसात हे अतिक्रमण आणि बस थांबे स्वच्छता न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सभापती, सदस्य आणि अधिकारी वर्गाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी दिला आहे.

KDMT bus stop

एकेकाळी कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम जोशात होता मात्र ढिसाळ नियोजनामुळे तो दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. केडीएमटी बस मधून प्रवाशांना प्रवास करता यावा आणि उचित ठिकाणी उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बस थांबे उभारले मात्र त्याची निगा आणि सुरक्षा करण्यात केडीएमटी प्रशासन अपयशी ठरली असून यामुळे प्रवासी वर्ग ही केडीएमटी बस सेवे पासून दूर चालला आहे. 

केडीएमटी बस मधील आतील भागात असलेला कचरा आणि धूळ यामुळे प्रवासी त्रस्त असताना आता बस थांब्यावर वर ही घाणीचे साम्राज्य झाले असून रिक्षा, कार, दुचाकी, खासगी बस, आदींनी अतिक्रमण केल्याने प्रवासी उभे राहणार कुठे, यामुळे बस कधी येते आणि जाते कधी ये समजत नसल्याने अनेकांना ताटकळत उभे राहावे लागते तर अनेक अन्य पर्याय निवडून तेथून निघून जातात त्यामुळे केडीएमटीचे अनेक बस मार्ग बंद पडले आहेत. 

कल्याण पश्चिम मधील स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी केडीएमटी बस स्थानक रिक्षा स्थानके बनवली आहेत तर मुरबाड रोड वरील स्टेट बँक परिसरात असलेल्या बस स्थानकावर दुचाकी, कार, आदींनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. तर सुभाष चौकात गामा जीप पार्किंग केल्या जातात हीच परिस्थिती कल्याण मुरबाड रोड आणि कल्याण व्हाया दुर्गाडी मार्गे बिर्ला कॉलेज रोड वरील बस थांब्याची दुरावस्था झाली असून यामुळे नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. याबाबत तक्रार करूनही केडीएमटी लक्ष्य न दिल्याने 8 दिवसात ही समस्या दूर न झाल्यास राष्ट्रवादी युवक  काँग्रेसच्या वतीने सभापती सहित सदस्य आणि अधिकारी वर्गाला घेराव घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद महाजन याने दिला आहे. 

तक्रार प्राप्त झाल्यावर वाहतूक पोलीस यांना कारवाई बाबत पत्र दिले असून स्वच्छतेबाबत पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारींना संबंधित तक्रार वर काम करण्यास सांगितल्याचे केडीएमटी वाहतूक विभागाचे वाहतूक निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे. 

याबाबत वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून उद्या न खाल्यास स्वतः दौरा करून कारवाई केली जाईल आणि कामचुकार केडीएमटी अधिकारी वर्गावर ही कारवाई करू सभापती संजय पावशे यांनी दिली.

Web Title: Marathi news mumbai news kalyan kdmt bus stop in bad condition