रस्त्यात येणार्‍या प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यास स्थानिकांचा विरोध 

रविंद्र खरात
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

कल्याण : रस्त्यात येणाऱ्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने सुरू झालेल्या कारवाईला स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे स्थगिती द्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने रस्त्यात येणारी प्रार्थनास्थळे हटविण्याची मोहीम सुरू केली होती. कल्याणच्या पूर्व भागातील कोळसेवाडी येथील गणपती चौकातील गणपती मंदिर हटविण्यासाठी कारवाई सुरू करत असताना नागरिकांनी त्यास विरोध केला. 

नागरिकांच्या विरोधामुळे महापालिकेच्या पथकास परत फिरावे लागले. मात्र, न्यायालयाचा आदेश असल्याने अनंत चतुर्दशीनंतर स्थानिक मंडळ हे गणपती मंदिर तेथून हलविणार आहेत. 

प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात या कारवाईस सुरवात केली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. गणेशोत्सव असल्याने पोलिसांनी यात मध्यस्थी केली. यावेळी सर्वपक्षीय नेते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवापर्यंत कारवाईला स्थगिती देत विसर्जनानंतर स्थानिक मंडळ हे मंदिर पर्यायी जागेत स्थलांतरित करेल आणि पालिका त्यास मदत करेल, असा तोडगा यातून काढण्यात आला. त्यानंतर स्थानिकांनी गणेश मंदिरात महाआरती केली.

Web Title: marathi news mumbai news kalyan news Ravindra Kharat