रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेज नेहमी तपासण्यात यावे - प्रवासी संघटना

रविंद्र खरात 
बुधवार, 10 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक आणि आजू बाजूच्या परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेज केवळ गुन्हा घडल्यावर तपासणी केली जाते मात्र तसे न करता प्रत्येक क्षणाला त्याची तपासणी करावी आणि सुरक्षा बलासोबत रेल्वे पोलीस ठाण्यातही कंट्रोल रूम असावी, तसेच आगामी रेल्वे बजेट मध्ये प्रवासी वर्गाच्या सुरक्षेवर भरीव रक्कम तरतूद करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. 

कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि परीसरात सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून त्याचे नियंत्रण रेल्वे सुरक्षा बलाकडे असून जेव्हा गुन्हा किंवा अपघात घडल्यावर रेल्वे पोलीस सुरक्षा बलाकडे पत्रव्यवहार करतात तद्नंतर फुटेज तपासणी केली जाते. त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास वेळ लागतो असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत. 

जानेवारीत सुरक्षा सप्ताह रेल्वे साजरी करेल तेव्हा सुरक्षा बलासमवेत रेल्वे पोलिसांना ही अधिकार आणि अत्याधुनिक साधन सामुग्री द्यावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. बहुतांश रेल्वे स्थानक परिसरात सीसीटिव्ही कॅमेरा लावण्यात आले असून काही गुन्हा घडल्यास रेल्वे पोलिसांना सुरक्षा बलाकडून संबंधित फुटेज घ्यावे लागते. यामुळे रेल्वे पोलीस ठाण्यातही कंट्रोल रूम असावी अशी मागणी केली आहे. फ्रेबुवारी महिन्यात रेल्वे बजेट मध्ये प्रवासी वर्गाच्या सुरक्षेवर रेल्वे मंत्री पियुष गोयल काय तरतूद करतात याकडे लक्ष लागले आहे. 

मागणी -
कल्याण ते कर्जत आणि कल्याण कसारा मार्गावर रेल्वे पोलीस ठाण्याची संख्या वाढवत मनुष्यबळ द्यावे. 
सीसीटिव्ही फुटेज प्रत्येक क्षणाला पाहणी केल्यास गुन्ह्यास आळा बसेल. 
सुरक्षा बलासारखे रेल्वे पोलीस ठाण्यात सी सी टिव्ही कॅमेराचे कंट्रोल रूम असावे. 
शहरी पोलिसांप्रमाणे रेल्वे पोलिसांना अत्याधुनिक साधन सामुग्री द्यावी.
प्रवासी वर्ग वाढती संख्या आणि गुन्हे ही वाढल्याने पोलिसांचे विशेष पथकाची निर्मिती करावी. 
प्रवासीच्या सुरक्षेसाठी रेल्वे बजेट मध्ये भरीव तरतूद करावी. 

Web Title: Marathi news mumbai news kalyan railway security