'शिवसंस्कार महोत्सव 2018'चा समारोप भव्य मिरवणुकीने

रविंद्र खरात
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण पूर्व सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार 17 फेब्रुवारी ते सोमवार 19 फेब्रुवारी 2018 दरम्यान कल्याण पूर्वमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मध्ये शिवसंस्कार महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला होता. त्याचा समारोप सोमवारी (ता. 19) सायंकाळी भव्य मिरवणुकीने झाला. 

कल्याण : कल्याण पूर्व सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार 17 फेब्रुवारी ते सोमवार 19 फेब्रुवारी 2018 दरम्यान कल्याण पूर्वमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मध्ये शिवसंस्कार महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला होता. त्याचा समारोप सोमवारी (ता. 19) सायंकाळी भव्य मिरवणुकीने झाला. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केवळ मिरवणूक न काढता त्यांची महती विद्यार्थी ते जेष्ठ नागरीकांना माहिती व्हावी यासाठी कल्याण पूर्व कल्याण पूर्व सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती  निमित्त शनिवार 17 फेब्रुवारी ते सोमवार 19 फेब्रुवारी 2018 दरम्यान कल्याण पूर्व मधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मध्ये शिवसंस्कार महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला होता. वाहनावर चित्ररथ लावण्यापेक्षा पायी चालत चित्ररथाचा समावेश करण्यात आला. मिरवणुकीची सुरुवात विविध मान्यवरांचा सत्काराने झाली. दादासाहेब गायकवाड क्रीडांगण पासून मिरवणुकीला सुरुवात झाली, सिद्धार्थ नगर, म्हसोबा चौक, मंगलराघोनगर, तिसगाव नाका, पूनालिंक रोड, काटेमानवली नाका, नाना पावशे चौक, जुने कोळशेवाडी पोलीस ठाणे, गणपती चौक मार्गे पुनः दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी तब्बल तीन तास भव्य मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत 16 चित्ररथ, 9 शाळा, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र साकेत आणि मॉडेल कॉलेज  100 विद्यार्थी, खडवली मधील भारतीय सैनिकी विद्यालय मधील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सर्व पक्षीय नेते, पोलीस अधिकारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौका चौकात फटाके आतिषबाजी, रुपेश गायकवाड निर्मित बासरीवाला ढोल ताशा पथक, जागोजागी रांगोळी, लेझिम पथक, शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा, आदी वैशिष्ट्ये होते. या मिरवणुकीत आमदार गणपत गायकवाड, आमदार जगन्नाथ शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ पाटील, विलास उतेकर, नगरसेवक मनोज राय, महेश गायकवाड, अभिमन्यू गायकवाड, गणेश भाने, रेखा चौधरी, सहित वसंतराव सूर्यवंशी, रमेश हनुमंते, सुभाष म्हस्के, नाना सुर्यवंशी, संजय मोरे, विष्णू जाधव, रवी हराळे, विजय भोसले, विष्णू गायकवाड, उदय रसाळ, सचिन पोटे, महादेव रायभोळे, भारत सोनावणे, अण्णा रोकडे, संदीप तांबे, संजय गुंजाळ, राजू अंकुश, शांताराम पवार, अनिल घुमरे, कालिदास कदम आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.

Web Title: Marathi news mumbai news kalyan shivjayanti shivasanskar mahotsav