कमला मिल अग्नितांडव : निलंबित अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : मोजोज बारच्या आगीमागे असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निलंबित करण्यात आलेले महापालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यपालांना केली आहे. 

विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई येथील कमला मिल कंपाउंड 'वन अबोव्ह' आणि बिस्ट्रो या दोन हॉटेल्सना आग लागण्याच्या घटनेबाबत सातत्याने नवनवीन माहिती पुढे येत आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारसमोर आणायचा असेल तर 'वन अबोव्ह' आणि 'मोजोज बिस्ट्रो'चे सर्व संचालक, कमला मिलचे संचालक, त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांनी विभागीय चौकशीची शिफारस केलेले दहा मनपा अधिकारी आणि अटकेत असलेले अग्निशामक अधिकारी राजेंद्र पाटील यांची 'नार्को' चाचणी करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. 

सर्व संशयितांची 'नार्को' चाचणी झाली, तर या अग्नितांडवासाठी कारणीभूत असलेले राजकीय नेते व अधिकारी कोण, याची वस्तुस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्‍त करण्यात आली आहे.

अशाप्रकारे नार्को चाचणी केल्यानंतर मुंबई शहरातील बेकायदा व अनधिकृत व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहेत व त्याचप्रमाणे महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीची संपूर्ण माहिती उघड होऊ शकेल, असेही विखेंनी या पत्रात म्हटले आहे.

Web Title: marathi news mumbai news Kamala Mill Fire New year celebration