उपाहारगृहांच्या गच्चीवर एक मीटरचे पावसाळी छत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मुंबई : पावसाळी छत उभारण्याची परवानगी घेऊन बेकायदा रूफटॉप उपाहारगृह सुरू करणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात फक्त एक मीटर उंचीचे पावसाळी छत उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर हॉटेल्स आणि उपाहारगृहांमधील लाकडी फर्निचरच्या वापरावरही निर्बंध घातले आहेत. 

मुंबई महानगरपालिकेने रूफ टॉप उपाहारगृहांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्यात गच्चीवर कोणत्याही प्रकारचे छत असू नये असा कठोर नियम आहे; मात्र प्रत्यक्षात यापूर्वी गच्चीवर पावसाळी छत उभारण्याची परवानगी घेऊन बारमाही रूफ टॉप उपाहारगृह सुरू असतात; मात्र शनिवारी पालिकेच्या मासिक आढावा बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी एक मीटरपेक्षा उंचीचे छत असल्यास थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. 

याचबरोबर उपाहारगृह आणि हॉटेल्समधील फर्निचरच्या वापरावरही निर्बंध आणले आहेत. उपाहारगृहांमध्ये लाकडी पार्टीशन, भिंतीवर लाकडी आच्छादने ठेवू नयेत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच लाकडी जिन्यांनाही परवानगी देऊ नये. अशा प्रकारच्या फर्निचरचा वापर असल्यास तत्काळ कारवाईचे आदेश सर्व प्रभागातील सहायक आयुक्तांना आयुक्तांनी दिले आहेत. उपाहारगृह आणि हॉटेल्समधील जिन्यांची रुंदी किमान दीड मिटर असणे बंधनकारक आहे. या नियमानुसार जिन्यांची रुंदी नसेल तर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

प्लास्टिक कारखाने रडारवर 
कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर पालिकेने अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व उद्योगांची तपासणी केली होती. त्यात प्रामुख्याने उपाहारगृहांची तपासणी केली होती; मात्र आता प्लास्टिकचे कारखाने, दुकाने तसेच रसायनांचा साठा, विक्री करणाऱ्या दुकानांच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेने यापूर्वीच वस्तू साठ्यानुसार करायच्या उपाययोजनांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार उपाययोजना नसतील तर थेट कारवाई होणार आहे.

Web Title: marathi news mumbai news Kamala Mill Fire New year celebration