बेकायदा बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई : दोन दिवसांत 700 हून अधिक हॉटेल्स, बार, पबवर कारवाई झाल्यानंतर महापालिका अधिकारी आणि बोगस तक्रारदारांचे सिंडीकेट उघड झाले आहे. बेकायदा बांधकामाला अभय देणाऱ्या सर्वच प्रभागांतील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी (ता. 1) दिले. 

बोगस तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमधील संगनमताची चौकशी करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व उपायुक्तांना दिले आहेत. बेकायदा उद्योग करणाऱ्यांना माहिती अधिकार वापरून ब्लॅकमेल करणारे अधिकारी आणि बोगस तक्रारदार यांचे दिवस भरले असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले.

कमला मिल दुर्घटनेनंतर अधिकारी आणि बोगस तक्रारदारांचे साटेलोटे उघड झाले. या प्रकरणी आयुक्त मेहता यांनी पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले. कमला मिल कम्पाउंड दुर्घटनेनंतर पालिकेने दोन दिवसांत 700 हून अधिक उपाहारगृहांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बेकायदा बांधकामांची माहिती असतानाही आतापर्यंत कारवाई केली जात नसल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी सातही परिमंडलांच्या उपायुक्तांना दिले. ही चौकशी अधिकाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता अधिकाऱ्यांनी बोगस आणि व्यावसायिक तक्रारदारांशी संगनमत करून या सर्व बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केले का? हेही तपासून पाहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांबरोबर या बोगस तक्रारदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

अधिकाऱ्यांची हप्तेवसुली 
माहिती अधिकाराचा वापर करून पालिकेचे अधिकारी आणि त्यांचे बोगस तक्रारदार बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना ब्लॅकमेल करून हप्ता वसूल करतात. सामान्य माणसाने बेकायदा बांधकामांबाबत तक्रार केल्यास त्याला केराची टोपली दाखवली जाते; मात्र याच बांधकामांबाबत पालिकेचे अनेक अधिकारी बोगस तक्रारदारांना तक्रार करायला लावतात. त्यानंतर तत्काळ कारवाईची नोटीस पाठवून ब्लॅकमेलिंग केले जाते. 

Web Title: marathi news mumbai news Kamala Mills fire BMC