कल्याण - केडीएमटी कर्मचारी अधिकाऱ्यांचे दोन महिने पगार नाही

रविंद्र खरात 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कल्याण : नवीन वर्षामधील जानेवारी, फेब्रुवारी महिना संपला असून मार्च महिना सुरू होणार असून महिन्याच्या पहिल्या दोन दिवस होळी आणि रंगपंचमी असून हा सण साजरा करण्यासाठी केडीएमटीच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या खिश्यात पैसा नाही कारण केडीएमटी प्रशासनाने दोन महिने झाले पगार आणि सन 2017 मधील सर्व पी एच ( सार्वजनिक सुट्टया ) व मागील फरकाची रक्कम न दिल्याने केडीएमटी कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त झाले असून 4 मार्च 2018 पर्यन्त ही पूर्तता न केल्यास सोमवार 5 मार्च पासून चक्का जाम आंदोलन करू असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु

कल्याण : नवीन वर्षामधील जानेवारी, फेब्रुवारी महिना संपला असून मार्च महिना सुरू होणार असून महिन्याच्या पहिल्या दोन दिवस होळी आणि रंगपंचमी असून हा सण साजरा करण्यासाठी केडीएमटीच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या खिश्यात पैसा नाही कारण केडीएमटी प्रशासनाने दोन महिने झाले पगार आणि सन 2017 मधील सर्व पी एच ( सार्वजनिक सुट्टया ) व मागील फरकाची रक्कम न दिल्याने केडीएमटी कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त झाले असून 4 मार्च 2018 पर्यन्त ही पूर्तता न केल्यास सोमवार 5 मार्च पासून चक्का जाम आंदोलन करू असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांना दिला आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमात (केडीएमटी) साडेपाचशेहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे. प्रति महिना केडीएमटीला कल्याण डोंबिवली महानगर पालिका कोट्यवधी रुपयांचा अनुदान देते, तसेच सन 2017 मधील सर्व पीएच (सार्वजनिक सुट्टया) व मागील फरकाची रक्कम देत असते मात्र जानेवारी, फेब्रुवारी महिना संपला असून मार्च महिना सुरू झाला असून कर्मचारी अधिकारी वर्गाचा पगार न झाल्याने मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी होळी आणि रंगपंचमी असून हा सण कसा साजरा करावा हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेकडून अनुदान न दिल्याने केडीएमटीच्या कर्मचारी वर्ग त्रस्त आहेत. रविवारी (ता. 4) मार्च पूर्वी कर्मचारी वर्गाचा पगार आणि थकबाकी न झाल्यास सोमवार ता 5 मार्च सकाळपासून डेपो मधून एकही बस निघणार नाही तर यावेळी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशाराकल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांना दिला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

केडीएमटीच्या कर्मचारी अधिकारी वर्गाचा पगार प्रश्न आहेच त्यासोबत कंत्राटी 71 कर्मचारी वर्गाला कायम करण्याचा मुद्दा प्रशासन टाळत आहेत. दोन महिने झाले आता तिसरा सुरू झाला नाही पगार नाही तर घर कसे चालेल, यामुळे आम्ही 4 मार्चची डेडलाईन दिली असून त्यापूर्वी पगार न झाल्यास सोमवारी (ता. 5) सकाळ पासून चक्काजाम आंदोलन करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली. 

केडीएमटी कर्मचारी वर्गाच्या अनुदान बाबत फाईल तयार असून पालिका आयुक्तांची सही होताच पगाराचा प्रश्न मिटेल अशी माहिती पालिका उपायुक्त सुरेश पवार यांनी दिली.

Web Title: Marathi news mumbai news kdmt employees no salary 2 months