समाजातील रोल मॉडेलना ओळखा - माधव जोशी

संजीत वायंगणकर
सोमवार, 15 जानेवारी 2018

डोंबिवली : आपल्या समाजात सर्व क्षेत्रात अनेक रोल मॉडेल आहेत, फक्त डोळसपणे आपण त्यांना ओळखले पाहिजे आणि त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक माधव जोशी यांनी केले. येथील ओंकार एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित ज्ञानोत्सव व्याख्यानमालेत बोलत होते. व्याख्यानमालेचे आज प्रथम पुष्प गुंफताना ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 

आपले व्यक्तीमत्व कसे चांगले होईल, हे सांगतांना माधव जोशी यांनी विद्यार्थ्यांना गरुडाची गोष्ट सांगितली. गरुड ढगांच्यावर भरारी घेतो. आपल्या आयुष्याला नवी चेतना देण्यासाठी गरुडाला अनेक शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. या वेदना सहन करत गरुड आपल्या जीवनाला नव्याने आकार देतो. गरुडाची ही जीवनशैली विद्यार्थ्यांनी स्विकारावे असे आवाहन जोशी यांनी केले. 

आपल्या जीवनात कुटुंबाचा मोठा सहभाग असतो, त्यांच्या मताचा आदर करा, असे सांगून जोशी यांनी सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व सांगितले. सकाळी उठल्यावर चांगल्या विचारांचे नमन करा. हे विचार दिवसभर टॉनिकचे काम करतील. दुसऱ्याचा आदर करा, बोलणे सौम्य ठेवा, विचार करुन बोला, वाद घालू नका, दुसऱ्याचे कौतुक करा या सर्वातून तुमच्यातील नेतृत्वाचे गुण समोर येतील, असे आवाहनही जोशी यांनी केले. 
माधव जोशी यांचे स्वागत ओंकार ट्रस्टच्या प्रमुख दर्शना सामंत यांनी केले. यावेळी विद्याथी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news lecture series