शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती व्हावा : जानकर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

ठाणे : राज्यातील शेतकरी हा मेहनती आहे. तो भविष्यात मोठा उद्योगपती झाला पाहिजे. शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते, असे विधान दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले. कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात बोलत होते. 

जानकर म्हणाले, ''पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सधन व उद्योजक झाला पाहिजे, असे वाटते. त्या दृष्टीने मी आणि माझे सहकारी काम प्रयत्न करत असून शेती, मत्स्य, पशुसंवर्धन व डेअरी व्यवसायासाठी सरकार नेहमी प्रोत्साहन देत असते. भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या धान्याला, वस्तूला, मत्स्यपालनाला चांगली बाजारपेठ आवश्‍यक आहे.

महिला बचत गटांमार्फत उद्योग करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य त्या प्रकारचे साहाय तसेच मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''

Web Title: marathi news mumbai news Mahadev Jankar