मनुष्य-मन-माणुसकी या संस्थेची अनोखी होळी

संजीत वायंगणकर
शनिवार, 3 मार्च 2018

डोंबिवली : मनुष्य-मन-माणुसकी या व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी अनोखी धुळवड साजरी केली. अनाथ मुलांच्या समवेत रंगोत्सवसाजरा करत त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला.

शहरातील मुले नेहमी सर्व सण उत्साहात साजरे करतात. पण जी मुले अनाथ आहेत, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, ज्यांना कोणी पालक नाहीत, त्या मुलांचा दोष काय असतो. त्यांनाही आपल्या सणाचा आनंद लुटता यावा, यासाठी मनुष्य-मन-माणुसकी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वज्रेश्वरी जवळ असलेल्या साईप्रसाद अनाथाश्रमाला भेट दिली व तेथील 17 अनाथ मुलांबरोबर धुळवड साजरी केली.

अशा प्रकारची धुळवड पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यात साजरी झाली व त्याचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 50 पिचकाऱ्या व निरनिराळ्या 5 किलो नैसर्गिक रंगांच्या साह्याने या लहानग्यांबरोबर संस्थेच्या सदस्यांनी होळीचा रंगोत्सव सण साजरा केला. संस्थेतर्फे त्यांना 80 पुरण-पोळ्या, 100 क्रिम बिस्कीटांचे पुडे, चॉकलेट, लाडू, बसण्यासाठी चटया, आदी भेटवस्तू दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Marathi news mumbai news manushya man manusaki group celebrates unique holi