वेडसर महिलेने पोलिस आणि अग्निशमन दलाला धरले वेठीस

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 27 जानेवारी 2018

मुंबई : शनिवारी सकाळी 9 वाजता ईस्टर्न फ्रीवे जवळील वाडीबंदर वाहतूक पोलिस शाखेला लागूनच असलेल्या पिंपळाच्या वृक्षावर चढून अती उंचावर ठाण मांडत एका वेडसर महिलेने वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाला चांगलेच वेठीस धरले होते. जवान त्या महिलेला सोडवण्यास जस जसे झाडावर चढून वर जात होते तस तशी ती महिला आणखीनच वर फांद्यांवर जात होती. 

मुंबई : शनिवारी सकाळी 9 वाजता ईस्टर्न फ्रीवे जवळील वाडीबंदर वाहतूक पोलिस शाखेला लागूनच असलेल्या पिंपळाच्या वृक्षावर चढून अती उंचावर ठाण मांडत एका वेडसर महिलेने वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाला चांगलेच वेठीस धरले होते. जवान त्या महिलेला सोडवण्यास जस जसे झाडावर चढून वर जात होते तस तशी ती महिला आणखीनच वर फांद्यांवर जात होती. 

त्या महिलेची मनःस्थिती ठीक नसल्याने तिने आपल्या जीवाचे काही बरे वाईट करू नये म्हणून तिला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मकरंद सुर्वे आपल्या जवानांसह युद्ध पातळीवर प्रयत्न करीत होते. तिला रेस्क्यू करण्यासाठी नेट लावण्यात आली होती. तसेच ट्रॅफिक पोलिस निरीक्षक प्रमोद तांबे यांनी वारंवार विनंती करीत त्या महिलेला सहकार्य करा, तुमच्या काही समस्या असतील तर त्या पोलिस जाणून घेतील खाली या असे भोंग्यावरुन आवाहन करीत होते. महिला पोलिसही तिला विनवणी करताना दिसून येत होत्या. तर उत्सुकतेपोटी वाहन चालक वाहने थांबवून वर झाडाकडे पहात होते. 

बघ्यांची जमलेली मोठी गर्दी आणि शेजारील पोलिस क्वार्टर्सच्या गच्ची वरूनही लोक हा सर्व प्रकार पहात होते. गाड्यांचा गोंगाट, कर्कश वाजणारे हॉर्न आणि लोकांचा आरडा ओरडा या मुळे येथे काय चालले आहे हे कोणालाच काहीही समजत नव्हते. पोलिसांचा पारा चढला तसे त्यांनी लोकांना लांब पांगवले. तांबे यांनी शिट्टी वाजवत ट्रॅफिक मार्गीका व्यवस्थित करण्यास सुरुवात केली. काही जवान हळूच त्या महिले जवळ पोहचले आणि त्यांनी तीला सुखरूप खाली आणले. 10:45 वाजता त्या महिलेला झाडावरुन खाली उतरविण्यास अग्निशमन जवान व पोलिसांना आलेले यश पाहता. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला तर काही बघ्यांनी चक्क् टाळ्या वाजवित या
 सक्सेस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या पोलिस व अग्निशमन जवानांना दाद दिली. उप निरीक्षक विजय राणे यांनी महिला पोलिसांच्या मदतीने त्या महिलेला आधी पाणी प्यायला दिले आणि नंतर डोंगरी पोलिस ठाण्यात नेले. उपनिरीक्षक देवीदास पडलवार हे त्या महिलेच्या बाबत अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Marathi news mumbai news mental patient