मुंबई : बी वॉर्डवर मिनारा मस्जिद संदर्भात मोर्चा

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई : 'बी वॉर्ड के सहाय्यक आयुक्त शिरूरकर पर कारवाई करो नही तो आते शुक्रवार को आधी मुंबई बन्द कर देंगे' अशी धमकी देत मुस्लिम समाजातील शिष्ट मंडळाने पालिका उपायुक्त सुहास करवंदे यांच्या समोर शिरूरकर यांच्या डिमोलिशन अॅक्शन विरुध्द तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.

मुंबई : 'बी वॉर्ड के सहाय्यक आयुक्त शिरूरकर पर कारवाई करो नही तो आते शुक्रवार को आधी मुंबई बन्द कर देंगे' अशी धमकी देत मुस्लिम समाजातील शिष्ट मंडळाने पालिका उपायुक्त सुहास करवंदे यांच्या समोर शिरूरकर यांच्या डिमोलिशन अॅक्शन विरुध्द तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.

आज दुपारी 12 वाजता बी वॉर्डच्या द्वारे समोरील रस्त्यावर बसून आमदार अमीन पटेल, माजी नगरसेवक यूसुफ अब्राहम, नगरसेविका आफरीन शेख व महिला पुरुष कार्यकर्त्यांसहित मोर्चात जवळपास 40 ते 50 एक लोक सामील झाले होते. तर बाकी बघ्यांची चांगलीच गर्दी होती.

मिनारा मस्जिद जवळील अनधिकृत दुकाने तोड़ू कारवाई करून निष्कासित करण्यात आलेली होती. याच संदर्भात शिरूरकर यांनी आमची दुकाने का? तोड़ली तसेच वर्षानुवर्ष येथे आम्ही व्यवसाय करीत असूनही आमच्यावर कारवाई का करण्यात आली?
कारवाई दरम्यान मस्जिदच्या गुंबदला नुकसान पोहचले आहे. त्याचा संदर्भ देत
सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांना निलंबित करावे अशीही जोरदार मागणी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
24 जानेवारी 2018 रोजी 77 मेमनवाड़ा या इमारतीला लागलेली आग नियंत्रीत करण्यासाठी अग्नीशमन दलाच्या वाहनांना प्रवेश सुकर करण्यासाठी या दुकानांवर निष्कारण कार्यवाही झाली होती.

दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल विभागातील मेमनवाडा मार्ग, पायधुनी येथील जगप्रसिध्द मिनारा मस्जिद या धार्मिक स्थळालगत असलेल्या रस्त्यांवर गेली अनेक वर्षे अनधिकृतपणे ठाण मांडूण बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या अनधिकृत पक्क्या बांधकामावर कार्यवाही सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरुरकर यांच्या पथकाने केली. त्या वेळी त्यांच्या सोबत सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे व चंद्रकांत सुर्यवंशी, किरण धस, वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) विलास पवार, वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) जगदीश केंगळे यांच्या उपस्थितीत तसेच 15 कामगार, 1 जेसीबी, 2 अतिक्रमण गाड्या यांच्या साह्याने सदर कार्यवाही करुन 25 ते 30 पक्के अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आणि मेमनवाडा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. या संदर्भात झोन एकचे पालिका उपायुक्त सुहास करवंदे यांनी
म्हटले की माझ्या समोर आलेल्या या तक्रारींचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल.

Web Title: Marathi news mumbai news minara masjid b ward