४८ अंश तापमानातदेखील मिताशीचा नवा एसी ‘कूल’ राहणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई : मार्चच्या मध्यावरच उन्हाचे चटके सोसणाऱ्यांसाठी आणि ४५ अंशांच्या वाढत जाणाऱ्या तापमानानंतर एसी चालत ‘नाही’ असं म्हणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वातानुकूलित यंत्र तयार करण्यात नेहमीच अग्रेसर आणि नाविन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या मिताशी कंपनीने ४८ अंश तापमानातही थंडगार वातावरण निर्माण करणारा एसी तयार केला आहे.

मिताशीचे सीएमडीचे राकेश दुगार म्हणाले, "मिताशीने नेहमीच भारतीयांना जागतिक दर्जाचे उत्पादन उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. आमच्यापेक्षा भारतीय हवामानाची अचूक स्थिती कोणीच समजू शकत नाही. आर्द्रता कमी करण्यासाठी कोरड्या उष्णतेचा सामना करण्यापासून नवे उत्पादन बाजारात आणले आहेत.

या उन्हाळ्यासाठी ३० नवीन मॉडेल लाँच केल्यासह  ज्यात ७ एक्सटीएम हेवीड्यूटी एसीचा समावेश आहे. एक टन, १.५ टन, आणि २ टन असे उपलब्ध असणार आहे. यात तांबे पाईप्स, ग्रेटर कूलिंग असल्याने वीज वाचवण्यास मदत होणार आहे. पाच वर्षाची वॉरंटी असणार आहे.

Web Title: Marathi news mumbai news mitashi ac 48 degree temperature