मनसे वाहतूक सेनेत इतर पक्षातील वाहतूक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

दिनेश चिलप मराठे
रविवार, 11 मार्च 2018

वाहतूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आर्थिकदृष्या व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी, वाहतूक चालक-मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

मुंबादेवी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 वा वर्धापनदिन 9 मार्च रोजी पार पडला. या निमित्ताने राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत अन्य पक्षातील वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी आणि चालक-मालक यांनी प्रवेश केल्याने मनसेची वाहतूक संघटना मजबूत झालेली असून, आमचे बळ चांगलेच वाढल्याचे मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले.

वाहतूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आर्थिकदृष्या व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी, वाहतूक चालक-मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष केशव मुळे यांच्यासह अनिल नागरे, विनोद अरगिले, उर्मिला साखरकर,राजू बनसोडे, सतिश लाड, श्रेया सरमळकर, वाहतूक सेनेचे देवेंद्र किर,संतोष शिंदे , साजिद खान,नईम शेख, इस्माईल शेख, संजय भणगे,आशिश मयेकर, अभिजीत मांडवे तसेच मुंबादेवीतील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

आजच्या या प्रवेशाने विरोधकांचे धाबे दणाणले असून, भविष्यात मनसेचा गड मजबूत होईल आणि त्याचा फायदा सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी उपयोगी होईल, असे केशव मुळे आणि प्रशांत गांधी यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News Mumbai News MNS Transport Offices Sena