मोनो बंद असूनही एमएमआरडीए नफ्यात ; कंत्राटदारांना दररोज साडेसात लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनीत मोनो रेल्वेच्या दोन डब्यांना लागलेल्या आगीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ती अनिश्‍चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्या ती बंद असूनही एमएमआरडीएला दररोज सात लाख 40 हजार रुपयांचा नफा मिळवून देत आहे. 

मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनीत मोनो रेल्वेच्या दोन डब्यांना लागलेल्या आगीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ती अनिश्‍चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्या ती बंद असूनही एमएमआरडीएला दररोज सात लाख 40 हजार रुपयांचा नफा मिळवून देत आहे. 

एमएमआरडीए प्रशासनाने स्कोमी इंटरनॅशनल कंपनी व एल ऍण्ड टी कंपनी या मोनो रेल्वेच्या कंत्राटदारांकडून 1 जानेवारीपासून ही सेवा सुरू होईपर्यंत दररोज सात लाख 40 हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा बंद असतानाही एमएमआरडीएला नफा मिळवून देत आहे; परंतु चेंबूर ते वडाळादरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या मोनोच्या 18 हजार प्रवाशांना ती बंद असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

होता साडेसहा लाखांचा तोटा 

मोनोच्या चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत होता. त्यामुळे मुंबई महानगर शहर विकास प्राधिकरणला (एमएमआरडीए) दररोज सहा लाख 40 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. 

पहिल्या टप्प्यातील स्थानके 

संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकरनगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा ब्रिज, आचार्य अत्रेनगर, ऍण्टॉप हिल, जीटीबी नगर. 

Web Title: Marathi News Mumbai news Mono Rail MMRDA is in Profit