आयटीतील संधींना खीळ बसणार : नारायण मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई : भारतातील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी पुढील आठ-दहा वर्षे आव्हानात्मक असतील. या कालावधीत या क्षेत्रातील नव्या नोकऱ्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीला खीळ बसू शकेल, असे भाकित 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी केले.

पवई आयआयटीच्या 'मूड इंडिगो' महोत्सवात 'भारतीय आर्थिक क्रांती' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. 

मूर्ती म्हणाले, 'अमेरिकेने आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे नवे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे तेथे गुंतवणूक वाढत आहे. परिणामी भारतातील आयटी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत असल्याने युवा पिढीला या क्षेत्रात नोकऱ्या मिळण्याची शक्‍यता फार कमी आहे. 

आयटी क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरील अधिकारी गल्लेलठ्ठ पगार घेतात. बदलत्या परिस्थितीत उद्योजकांना आर्थिक समतोल ठेवायचा आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांवर होईल. 'फ्रेशर्स'ना पूर्वीप्रमाणे 'ओपनिंग' मिळणार नाही. भारतात आयटी कंपनी चालवणे अवघड झाले आहे. या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत उद्योजकांना नफा मिळत नसल्याने हा परिणाम जाणवत असल्याचे मतही मूर्ती यांनी व्यक्त केले.

Web Title: marathi news mumbai news mood indigo Narayan murthy