प्रथम श्रेणीच्या पासधारकांना एसी लोकल प्रवासास मुभा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : प्रथम श्रेणीचे मासिक पास व वातानुकूलित लोकलचे मासिक पास यातील फरक असलेली अतिरिक्त रक्कम भरून प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. ही सुविधा सोमवार(ता. 22)पासून सुरू होणार आहे. 

ऐन गर्दीची वेळ असतानाही वातानुकूलित लोकल रिकाम्याच धावत होत्या, असे रेल्वे प्रशासनाने 15 दिवस केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने शुक्रवारी (ता. 19) परिपत्रक काढून वरील निर्णय जाहीर केला.

वातानुकूलित लोकल सुरू झाल्यानंतर प्रथम श्रेणीच्या पासधारकांनी त्यांना प्रथम श्रेणीचा पास अद्ययावत करून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. 

प्रथम श्रेणीच्या तिकीटधारकांनाही वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येईल. तिकीट तपासणीस कोणतेही दंड न आकारता अतिरिक्त रक्कम भरून त्या प्रवाशाला वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देईल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे; मात्र ही मुभा फक्त ठराविक कालावधीसाठी आहे.

वातानुकूलित लोकलचे तिकीट दर हे प्रथम श्रेणीचे 1.2 टक्के 26 जानेवारी 2018 पर्यंत असणार आहे, तोपर्यंत ही मुभा देण्यात आली आहे. सध्या प्रथम श्रेणीचे तिकीट दर हे चर्चगेट-विरार 170 रुपये; तर चर्चगेट-बोरिवली 140 रुपये तिकीट दर आहे, तर वातानुकूलित लोकलचे तिकीट दर हे चर्चगेट विरारसाठी 205 रुपये; तर चर्चगेट-बोरिवलीसाठी 165 रुपये आहे. 

मासिक पास हे प्रथम श्रेणीसाठी चर्चगेट-बोरिवली प्रवासासाठी 755 व चर्चगेट-विरारसाठी 1 हजार 185 रुपये आहे. हेच वातानुकूलित लोकलचा मासिक पास दर अनुक्रमे 1 हजार 640 रुपये व 2 हजार 40 रुपये इतके आहे. 

आरक्षण केंद्रावर मासिक पासमध्ये बदल 
रेल्वेस्थानकातील तिकीट आरक्षण केंद्रांवर प्रथम श्रेणी मासिक पासमधील विस्तारित बदल करून देण्यात येईल. हा बदल होईपर्यंत वातानुकूलित लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या पासधारकांना मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांकडून पावती देण्यात येईल.

Web Title: marathi news Mumbai News Mumbai AC Local