प्रदूषणाची माहिती देण्यासाठी आणखी 13 स्थानके 

नेत्वा धुरी
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे चिंता व्यक्त होत असल्याने मुंबई शहर व नजीकच्या परिसरातील प्रदूषणाबाबतची माहिती घेण्यासाठी 13 नवी स्थानके महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार काणार आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे चिंता व्यक्त होत असल्याने मुंबई शहर व नजीकच्या परिसरातील प्रदूषणाबाबतची माहिती घेण्यासाठी 13 नवी स्थानके महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार काणार आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबईतील हवा प्रदूषणाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) शीव व वांद्रे ही स्थानके आहेत. या ठिकाणच्या सल्फर डायऑक्‍साईड आणि नायट्रोजन डायऑक्‍साईड आदींचे प्रमाण दिले जाते; परंतु या दोन स्थानकांच्या मर्यादा लक्षात घेऊन आणि केंद्रीय वने व पर्यावरण खात्याच्या नियमावलीनुसार प्रत्येक काही किलोमीटरच्या अंतरावर हवेच्या प्रदूषणाचे मोजमाप करणारी स्थानके तयार करण्याची योजना एमपीसीबीची आहे. त्यानुसार सध्या 14 स्थानकांसाठी जागा शोधण्यात एमपीसीबीचे अधिकारी गुंतले आहेत.

मुंबई ते पालघरदरम्यान ही स्थानके तयार करण्यात येणार आहेत. स्थानिक पालिका प्रशासन, अग्निशमन दल यांच्या परवानगीची त्यासाठी प्रतीक्षा आहे. 

'सफर'चा आढावाही एमपीसीबीकडे ? 
तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाचा आढावा देण्याचे काम 'मुंबई सफर' प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खाते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅटिरिओलॉजी (आयआयटीएम) या संस्थांच्यावतीने प्रमुख स्थानकांतील हवेच्या प्रदूषणाची माहिती शहरभरातील विविध भागांतील फलकांवर प्रसारित केली जाते. मात्र हवेच्या प्रदूषणाच्या दर्जाची माहिती देण्याचे काम एमपीसीबीने करावे, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण खात्यानेच दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसारही चर्चा सुरू असल्याचे समजते.

Web Title: marathi news mumbai news mumbai air pollution