लोकल उभ्या करण्यासाठी कारशेडच्या जागेचा शोध

संतोष मोरे
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मुंबई : भारतीय रेल्वे मुंबईकरांसाठी तब्बल 257 नवीन लोकल खरेदी करणार आहे; मात्र अपुऱ्या जागेअभावी नव्या लोकल उभ्या कुठे करणार, असा प्रश्‍न मुंबई रेल्वे प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे या लोकल उभ्या करण्याकरिता कारशेडसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सध्या पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात 255 लोकल धावत आहेत. या दोन्ही मार्गांवर दररोज तीन हजार 87 फेऱ्या होत असून, दररोज 76 लाख मुंबईकर या मार्गावर प्रवास करतात. उपनगरीय मार्गावर अनेक लोकलची भर पडली आहे. त्यात नुकतीच एसी लोकलही दाखल झाली असून, वर्षभरात आणखी नव्या लोकलची भर पडणार आहे; मात्र या लोकल कुठे उभ्या करणार, असा प्रश्‍न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

महिनाभरापूर्वी मुंबई रेल्वे बोर्डाचे सदस्य आणि उपनगरी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील यार्डची पाहणीही केली. रेल्वे यार्डाची क्षमता वाढवण्यासाठी पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील नव्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. 

या भेटीत रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी विरार कारशेडची पाहणी करून तेथे लोकल उभ्या करण्यासाठी क्षमता वाढवावी, अशी सूचना केली. सध्या विरार कारशेडमध्ये 60 लोकल उभ्या राहतात; मात्र प्रत्यक्षात तेथे 90 लोकलची क्षमता आहे.

लोकल उभ्या करण्यासाठी आम्ही मुंबईबाहेर पर्यायी जागा शोधत आहोत. बोईसर किंवा महापेनजीक कारशेड उभारण्याचा विचार सुरू आहे. तेथे भविष्यात एसी लोकलही उभ्या केल्या जातील, असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगिले.

Web Title: marathi news mumbai news Mumbai Local Indian Railway