माजी कुलगुरूंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मुंबई : निकाली गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट मूव्हमेंट या विद्यार्थी संघटनेने आपला लढा अजून प्रखर केला आहे. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस कारणीभूत असलेल्या माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट मूव्हमेंटचे अध्यक्ष नितीन माने यांनी केली आहे.

राज्यभरात ज्या ठिकाणी राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असेल तिथे आमची विद्यार्थी संघटना घेराव टाकेल, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला. 

नॅशनल स्टुडण्ट युनियन ऑफ इंडिया, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटना, प्रहार विद्यार्थी संघटना, पुरोगामी विद्यार्थी संघटना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, स्वाभिमानी विद्यार्थी संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, स्टुडण्ट लॉ काऊन्सिल, स्वाभिमान विद्यार्थी संघटना आणि इतर संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आठवड्याभरापूर्वी प्रोग्रेसिव्ह स्टुडण्ट मूव्हमेंट या विद्यार्थी संघटनेने कलिना विद्यापीठात बेमुदत उपोषण पुकारले होते. निकाली गोंधळात ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जावी, अशी मागणी माने यांनी केली होती. तीन दिवसांच्या उपोषणानंतर राज्यपालांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर माने यांनी उपोषण मागे घेतले.

आपल्या मागण्यांबाबत सरकार दरबारी हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असेही माने यांनी सांगितले. 

Web Title: marathi news mumbai news Mumbai University Results