डोंबिवलीत माझी मराठी स्वाक्षरी मोहीम

संजीत वायंगणकर 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

डोंबिवली : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्यावतीने आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता  पूर्वेतील स्टेशन परिसरात “माझी स्वाक्षरी मराठी“ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.

डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपर स्टेशनच्या बाहेर मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पूर्वेतील बाजीप्रभू चौक येथे मराठी स्वाक्षरी मोहीम मोठे पांढरे बॅनर लावून त्यावर डोंबिवलीकरांकडून  स्वाक्षरी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये जाऊन कवी कुसुमाग्रज यांचे फोटो भेट म्हणून देण्यात येणार आहेत. सगळीकडे मराठा भाषा दिनानिमित्त प्रत्येकाने घराबाहेर रांगोळी  काढण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे मनविसेचे शहराध्यक्ष सागर जेधे यांनी कळविले आहे. जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त , डोंबिवली रेल्वे परिसरात मनसे डोंबिवली शहरातर्फे सुंदर व भव्यदिव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

Web Title: Marathi news mumbai news my marathi sign campaign