नागपूर न्यायालयातून फरार आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

नागपूर येथील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या गुन्ह्यात राहुल गायकवाड याला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. 21 फेब्रुवारीला त्याला नागपूर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालय आवारातून पोलिसांना गुंगारा देत तो फरार झाला होता.

ठाणे : नागपूर न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला होता. राहुल प्रकाश गायकवाड (18) असे त्यांचे नाव आहे. त्याला अवघ्या 24 तासांत ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ठाण्यातून अटक केली. 

नागपूर येथील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या गुन्ह्यात राहुल गायकवाड याला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. 21 फेब्रुवारीला त्याला नागपूर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालय आवारातून पोलिसांना गुंगारा देत तो फरार झाला होता. फरार राहुल हा ठाण्यातील विवियाना मॉल परिसरात राहत असल्याची माहिती ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाच्या पथकास मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सचिन तडाखे, सहायक पोलिस निरीक्षक सानप, पोलिस हवालदार शशिकांत नागपुरे, पोलिस नाईक सुधीर म्हात्रे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी विवियाना मॉल परिसरातून त्याला अटक केली. त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

Web Title: Marathi News Mumbai News Nagpur Court Criminal Absconder