"नाणार प्रकल्प लादणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यास त्यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुंबईतील आझाद मैदानात या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करून, शिवसेना नाणार प्रकल्पाबाबत डबल गेम खेळत आहे. या प्रकल्पाला मंजुरी देणारे आणि विरोध करणारेही तेच आहेत, अशा शब्दांत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. मी माझ्या पक्षाचे काय करणार, हे आठ दिवसांत कळेल. शिवसेनेला माझी काळजी करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
Web Title: marathi news mumbai news nanar project devendra fadnavis