शालार्थ आयडी मिळालेल्या सर्वांचे वेतन ऑफलाईन देण्याबाबत आदेश काढण्यात यश

प्रमोद पाटील 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सफाळे : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणाली नुसार ऑनलाईन होत होते, 12 जानेवारी 2018 पासून ऑनलाईन प्रणाली बंद पडल्याने 2 फेब्रुवारी व 23 फेब्रुवारी ला ऑफलाईन वेतन देण्याबाबत शासन आदेश झाला. परंतु त्यामध्ये डिसेंबर महिन्याचे व जानेवारी महिन्याचे ज्यांचे वेतन शालार्थ प्रणाली नुसार झाले होते त्यांचेच वेतन देण्याचे आदेशीत करण्यात आले होते. शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या अडचणी शासन दरबारी मांडून शालार्थ आयडी मिळालेल्या सर्वांचे वेतन ऑफलाईन देण्याबाबत आदेश काढण्यात आला असल्याची माहिती शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी दिली.

12 जानेवारी 2018 ला शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने बंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी अंशतः व पूर्णतः अनुदानित शाळेतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याचे 2 फेब्रुवारी 2018 रोजी शासन निर्णय झाला. त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2017 व त्या अगोदर काही महिन्याचे वेतन काही कारणास्तव बदली मान्यता, मुख्याध्यापक मान्यत अतिरिक्त समावेशन अशा अनेक करणामुळे शालार्थ प्रणालीतून झाले नसल्यास त्यांचे जानेवारी 2018 चे वेतन ऑफलाईन काढता आले नाही. याबाबत आमदार पाटील यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्वरित दुरुस्ती चे परिपत्रक काढण्याचे आदेशीत केले. त्यामुळे दुरुस्तीच्या परिपत्रकाची संपूर्ण महाराष्ट्रातील वेतनापासून दूर राहिलेल्या शाळा वाट पाहत असताना वेतनाबाबतच्या 23फेब्रुवारी 2018 रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे वेतनापासून वंचित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी चिंतेत होते.

राज्यातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांच्या हक्काच्या वेतनापासून दूर राहिलेले होते, मार्च अखेर आल्याने फारच अडचणीत कर्मचारी आले होते. याची गंभीर दखल घेऊन ज्यांचा शालार्थ आयडी आहे त्यांचे वेतन ऑफलाईन काढावे यासाठी आ बाळाराम पाटील, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक आघाडीचे आ श्रीकांत देशपांडे,  यांनी स्वतः मंत्रालयातील संबंधित प्रत्येक टेबलवर जाऊन दुरुस्ती फाईल पुढे पाठवून आदेश काढण्यास शासनाला भाग पाडले. दुरुस्ती आदेशामुळे एप्रिल 2017 पासून एप्रिल 2018पर्यंत चे वेतन मिळण्यासाठी चा मार्ग या आदेशाने मोकळा झाला आहे. 

Web Title: Marathi news mumbai news offline payment