वृद्ध महिलेची गोरेगावमध्ये हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई - वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 1) गोरेगाव परिसरात घडली. मिरूबेन पटेल (75) असे या महिलेचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने तिची हत्या झाली असावी, असा गोरेगाव पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिरूबेन या गोरेगावच्या मिठानगरच्या गावदेवी इमारतीत मुलासोबत राहत होत्या. त्यांची एक मुलगी शेजारील इमारतीत राहते. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामावर गेला, तेव्हा मिरूबेन या एकट्याच घरात होत्या. सायंकाळी त्याचा मुलगा घरी आला, तेव्हा घराला बाहेरून कडी लावली होती. मुलाने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. तेव्हा मिरूबेन या बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते.
Web Title: marathi news mumbai news old women murder