'आमची मुंबई, आमची बेस्ट' संघटनेचा मोर्चा

संजय शिंदे
सोमवार, 5 मार्च 2018

'आमची मुंबई, आमची बेस्ट' संघटनेतर्फे आज ता. 5 रोजी संध्याकाळी 4 वाजता वीर कोतवाल उद्यान ते वडाळा बेस्ट आगार असा मोर्चा काढण्यात आला होता. 

धारावी - मुंबईकरांना सर्वोत्तम प्रवास व्यवस्था देण्याचा ‘बेस्ट'चा इतिहास राहिला आहे. सतत होणारी दरवाढ, गुंतवणुकीचा अभाव आणि खाजगी वाहन कंपन्यांना झुकते माप देणारी सरकारची धोरणे यामुळे अलीकडच्या काही वर्षांत समस्या निर्माण झाली आहे आणि आत्ता तर ती अधिक गंभीर झाली आहे. याविरोधात 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संघटनेतर्फे आज ता. 5 रोजी संध्याकाळी 4 वाजता वीर कोतवाल उद्यान ते वडाळा बेस्ट आगार असा मोर्चा काढण्यात आला होता. 

मुंबईचे नागरिक म्हणून आपण समजून घ्यायला हवे कि मुंबई मनपा कशी पद्धतशीरपणे सर्वसामान्यांसाठी किफायतशीर असणाऱ्या “बेस्ट”ला समस्याग्रस्त भासवून तिचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत आहे. बेस्टच्या व्यवस्थापनाने मे 2018 पासून खाजगी कंपन्यांच्या बसेस भाडेपट्टीवर कंत्राटी पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. 

Web Title: marathi news mumbai news organization march