कीबोर्डच्या कीज् पासून बनवले ए. पी. जे अब्दुल कलामांचे भव्य मोझेक

अक्षय गायकवाड
शनिवार, 27 जानेवारी 2018

विक्रोळी : देशाचे माजी राष्ट्रपती व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी की बोर्डच्या कीजपासून त्यांचे भव्य मोझेक पवई येथे साकारण्यात आले आहे.

विक्रोळी : देशाचे माजी राष्ट्रपती व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी की बोर्डच्या कीजपासून त्यांचे भव्य मोझेक पवई येथे साकारण्यात आले आहे.

26 जानेवारीपासून हिरानंदानी येथील गॅलरीया येथे मोझेक नागरिकांसाठी पाहण्यास खुले करण्यात आले आहे. 31 तारखेपर्यँत ते पाहते येणार आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना ही अनोखी कला पाहता येणार आहे. चेतन राऊत या तरुण कलाकाराने कलाम यांची तब्बल 15 x 20 फुटांची संगणकाच्या कीपॅड मधील किज पासूनची ही प्रतिमा साकारली आहे. त्यासाठी 87 हजार कीजचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी कलाम यांचे कोणतेही चित्र किंवा आराखडा यांचा आधार घेण्यात आलेला नाही. या आधी चेतनने कॅसेटपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीडीजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. तर यंदाच्या आयआयटी टेकफेस्ट मध्ये कागदी कपा पासून कॅसल तयार केला होता. 

चेतनच्या थ्रीडी इफेक्टच्या कलाकृतीही जगप्रसिद्ध आहेत. आता त्याने इ-कचरा असलेल्या कीपॅडच्या किज मधून कलाम यांचे मोझेक बनवले आहेत. कीज गोळा करण्यासाठी चेतनने मुंबई, ठाणे, कल्याणचे अनेक भंगार बाजार गाठून अडीच हजार कीबोर्ड जमा केले. सलग सहा दिवस मित्रांच्या मदतीने त्याने दहा रंगांच्या छटा यात वापरून ही भव्य कलाकृती साकार केली आहे. इ-कचऱ्यापासून कलाकृती तयार करता येऊ शकते, तसेच हे केतन यांनी दाखवून दिले आहे. कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती चेतन राऊत आणि त्याच्या मित्रांनी केली आहे. 
कलाम यांचा जीवनपट कीजवर उलगडण्यात आले आहे. तशी रचना कीजच्या अक्षरानुसार करण्यात आले आहे.

 

Web Title: Marathi news mumbai news a p j abdul kalam art made by keys