पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा गुंतवणूक परत मिळण्यासाठी मुंबईत ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

या निवेदन रॅलीला मुंबईचे निवृत्त सहाय्यक आयुक्त अशोक गोरे, इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरविंद पेडणेकर, सचिव विशाल बेर्डे, खजिनदार व्ही. पी. गोसावी आदींसह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आजच्या निवेदन रॅलीला महाराष्ट्रासह देशभरातून गुंतवणूकदार उपस्थित होते.

तारळे : पॅनकार्ड क्लब कंपनीत सुमारे 51 लाख गुंतवणूकदारांचे अडकलेले सात हजार पस्तीस कोटी रुपये परत मिळावेत म्हणून मुंबई स्थित इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्ट ने सेबीच्या विरुद्ध आयोजित केलेल्या मोर्चा कम निवेदन रॅलीला मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित राहिले. सकाळी दहा पासुन सायंकाळी चार पर्यंत गुंतवणूकदार बांद्रा कुर्ला परिसरातील मैदानात ठाण मांडून होते. यावेळी सेबी हाय हाय, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाही, नाही कुणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा आशा घोषणांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसर दुमदुमून गेला होता. 

इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त ट्रस्टी विश्वास उटगी यावेळी मोर्चाला संबोधित करताना म्हणाले, सेबीचे अजय त्यागी हे आमचे कलेम फॉर्म स्वीकारत नाहीत. तोवर आम्ही मैदानातुन हलणार नाही. वास्तविक लोकशाही राज्यात त्यागिंचे वर्तन राजा व नबाबा सारखे आहे. आम्ही सनदशीर व कायद्याच्या मार्गाने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी कायद्यानुसार भरलेले पन्नास हजार अर्ज आणले आहेत. मात्र त्यागी आमची कुठलीही दखल घेत नाहीत. याशिवाय सॅट कोर्टाच्या आदेशानुसार सेबीने कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे द्यायचे आहेत. या प्रक्रियेत सेबी विलंब करत असून मालमत्ता कवडी मोल दराने विकत असल्याचाही आरोप केला. त्यामुळे गुंतवणूक दारांचे पैसे मिळण्यास अडचणी येतील, त्याकरिता गुंतवणूक दरांच्या वतीने इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टचे काही प्रतिनिधिंचा समावेश या प्रक्रियेत सेबीने करून घ्यावा अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.

या निवेदन रॅलीला मुंबईचे निवृत्त सहाय्यक आयुक्त अशोक गोरे, इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरविंद पेडणेकर, सचिव विशाल बेर्डे, खजिनदार व्ही. पी. गोसावी आदींसह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आजच्या निवेदन रॅलीला महाराष्ट्रासह देशभरातून गुंतवणूकदार उपस्थित होते. सेबीने सरतेशेवटी संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून काही निर्णय जाहीर केले असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले अन उपस्थित गुंतवणूक दारांनी जोरदार टाळ्या वाजवून याचे स्वागत केले. सकाळी दहा पासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हात ठिय्या मारलेल्या गुंतवणूक दारांचेही संयोजकांनी आभार मानले. त्यानंतर निवेदन रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

दुपारी दोन पर्यंत सेबीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मैदानात गुंतवणूक दारांनी घोषणांचा पाऊस सुरूच होता. शेवटी सेबीकडून इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टच्य प्रतिनिधींना चर्चेसाठी निरोप देण्यात आला. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली इन्व्हेस्टर ऍक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख मान्य झालेल्या मागण्या खालीलप्रमाणे

1 कंपनीच्या एखाद्या मालमत्तेचे मूल्य कमी वाटल्यास संघटनेने त्याबाबत सूचना दिल्यास त्याचा विचार करू

2 ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक दारांचे कलेम अर्ज सेबी स्वीकारणार

3 मालमत्ता विक्री संबंधित संघटनेचे प्रतिनिधींना सामावून घेण्यबाबत सकारात्मक विचार करू

4 पॅनकार्ड क्लब संदर्भात विविध प्रक्रिया पार पाडताना वेळोवेळी संघटनेला माहिती दिली जाईल तसेच संघटनेच्या सूचनांचाही विचार करू

5 नजीकच्या काळात आणखी मालमत्ता विक्री झाल्यावर गुंतवणूक दारांचे पैसे देण्यासाठी संघटनेस सोबत घेऊन कार्यक्रम आखू

Web Title: Marathi news Mumbai news pan card club invester