पत्रा चाळ पुनर्विकासातील विकसक काळ्या यादीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई - गोरेगाव येथील सिद्धार्थनगरमधील पत्रा चाळ पुनर्विकासात गैरव्यवहार करणाऱ्या विकसकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतल्यानंतर काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराच्या नेमणुकीचे आदेश दिले आहेत.

पत्रा चाळ गैरव्यवहारप्रश्‍नी नुकतीच म्हाडा कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. म्हाडाने पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प आपल्या ताब्यात घेण्यासंदर्भात यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार म्हाडाने विकसकाला प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत नोटीस पाठवली आहे. हा संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर विकसकाने केलेले पुनर्विकासाचे काम, म्हाडाचा हिस्सा व विक्री घटकांच्या इमारतीच्या कामांच्या मूल्यांकनासाठी तत्काळ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करावी, असे निर्देशही वायकर यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने विकसकाला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: marathi news mumbai news patra chal redevelopment black list