अंबाडी येथील ओमकार पतसंथा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात

अंबाडी येथील ओमकार पतसंथा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात

वज्रेश्वरी (मुंबई) : येथे भिवंडी तालुक्यातील अंबाड़ी येथील ओमकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या; अंबाडी ही गेली 17 वर्ष कार्यरत असून संस्थाध्यक्ष, सचिव व व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारामुळे संस्था बंद करण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे ती बंद करण्याची मागणी एम. बी. पाटील यांनी केली आहे.

या संस्थेने मागील 17 वर्षात कधीच वार्षिक सर्वसाधारण सभेचे बोलवली नव्हती, ती काही संचालक व सभासदांच्या सततच्या मागणी केल्यामुळे  ता. 27.09.2017 रोजी सभेचे आयोजन केले होते. 

सदर सभेचे कामकाजास सुरु होताच संस्थेचे सभासद व सहकार क्षेत्रातील एम. बी. पाटील यानी सदरच्या सभेसाठी काढण्यात आलेल्या अजेंडावर आक्षेप नोंदविला, अजेंडावर संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या व नोंदणी क्र. नसून त्यावर संस्थेचे व्यवस्थापक यादव पाटील यांचे फक्त नावाचा उल्लेख असल्यामुळे घेण्यात येणारी ही सभाच बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सर्व संचालक व सभासदांच्या निदर्शनास आणून दिले. सोबत संस्थेचे आतापर्यंतचे ऑडिट बोगस झाले असून ऑडिटर हा व्यवस्थापक यांचा मुलगा आहे. पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम कोणाही सभासदाला त्याची कल्पना न देता घरातील व  रक्ताच्या नात्यातील सभासद घेतले असून बहुतांश संचालक व अध्यक्ष हे संस्थेचे थकित कर्जधारक आहेत. त्यातच एससी/एसटी/भटके या संचालकांची व सहकार क्षेत्रातील तज्ञ संचालकांची नेमणूक झालेली नाही. 

उर्वरित मधील एकही तज्ज्ञ नसल्यामुळे संचालक मंडळच बोगस आहे. संस्थेच्या कामकाजाचा अहवाल, हिशेबाची पत्रके, अन्दाजपत्रक उपलब्ध नाहीत, तसेच शासकीय लेखापरिक्षकाकड़ून  लेखापरीक्षण (ऑडिट) केले जात नाही. अनेक बोगस कर्ज थकबाक़ीदार असून त्यांच्यावर 101 अन्वये आजपर्यंत एकही प्रकरण सहा. निबंधक यांच्याकडे दाखल नाही. कर्जधारकांवर कारवाई नाही. यंत्रणा असतांना ऑनलाइन व्यवहार नाहीत.

व्यवस्थापक यांचे वय 72 असतांना ते पदावर कार्यरत कसे? सोनेतारण व कर्ज वाटपात मोठा भ्रष्टाचार. नियंबाह्य संचालाक व त्यांच्या नातेवाईक यांच्या नावे अनेक बोगस कर्ज वाटप केले आहे. कार्यक्षेत्रापालिकडील पालघर जिल्ह्यात कर्ज वाटप व थकित. संस्थेच्या काही एजंटनी मोठ्या प्रमाणावर रक्कमांचे अपहरण करुन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. काही कोटी रूपयांत संस्थेचा व्यवहार असूनही ती तोट्यात दाखविली जाते. 17 वर्षात सभासदांना डिविडंट वाटप केला नाही. तारण कर्ज थकित म्हणून जप्त केलेली महिंद्रा-झायलो गाड़ी गेली अनेक महीने संस्थेचे अध्यक्ष स्वताच्या खाजगी वापरासाठी करतात विशेष बाबा अशी की संस्थेची आर्थिक स्थिती खराब असतांना गेल्या तीन महिन्यांमधे 70 लाखांपेक्षा जास्त ठेवी सभासदांनी काढून घेतल्या असून संस्था सध्या डाबघाईत आहे. 

संस्थेच्या अशा प्रकारच्या या मनमानी कारभारास एम. बी. पाटील यांनी दि. 12.12.2017 ला सहकार खात्याला अर्ज केला होता, त्या अर्जाची गंभीर दखल घेऊन  सहा. निबंधक, भिवंडी, लोखंडे यांनी तातडीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये ए. जी. जाधव शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून निमणुक करण्यात आली. जाधव यांनी सदरहु संस्थेची सखोल चौकशी करुन आपला अहवाल 16 जानेवारी 2018 ला संबंधित खात्याला सादर केला असून या आहवालात व्यवस्थापक व संचलक यांनी पदाचा ग़ैरवापर, मनमानी कारभार, अपूर्ण दप्तर, थकित कर्ज, आर्थिक अपराथापर व लाखोंनी भ्रष्टाचार झाल्याचे समजते. 35 पेक्षा जास्त थकित कर्ज व त्यापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झालेला आहे. व्यवस्थापक यांनी सर्व संचालक मंडलाला अंधारात ठेऊन सोने तारण कर्ज़ात व इतर रकमेत मोठा भ्रष्टाचार केला आहे, म्हणून संस्थेचे अध्यक्ष आर.जी. पाटील, सेक्रेटरी सीताराम ठाकरे व व्यवस्थापक यादव पाटील हे तिघे जबाबदार असून हे बोगस असलेले संचालक मंडळ मा. सहा. निबंधक यांनी बरखास्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुण संस्थेचे झालेले नुकसान संबंधितांच्या वैयक्तिक मालमत्तेतुन सक्तिने वसूल करुन संस्थेवर प्रशासकाची निमणुक करावी अशी मागणी एम.बी. पाटील यांनी केली आहे. त्यांना सभासदांकडून पाठींबा मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com