मुंबईचे पोलिस आयुक्तांची हाजी अब्दुल रहमान शाह बाबा उरुसाला भेट

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या डोंगरी पोलीस ठाणे येथे हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांच्या उरुसानिमित्ताने मुंबईचे पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांनी फूल चादर अर्पण करीत पोलिसांतर्फे श्रद्धा अर्पण केली.

त्यावेळी सोबत सहआयुक्त देवेन भारती (कायदा व सुव्यवस्था), अतिरिक्त आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, सहाय्यक आयुक्त मंगेश पोटे आणि वपोनि संदीप भागडीकर, जेजे मार्ग वपोनि गायकवाड उपस्थित होते. येथे प्रार्थनेनंतर संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला. हिंदू-मुस्लिम धर्मीय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news police commissioner attends dargah festival