फेरीवाल्यांवरील कारवाईसंदर्भात राज ठाकरे यांचे प्रशासनाला पत्र

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

मुंबादेवी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लिखित पत्र पालिका,पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना फेरीवाला कारवाई संदर्भात मुंबईतील विविध विभागातील अध्यक्षांतर्फे देण्यात येत आहे. मुंबादेवी विभाग अध्यक्ष केशव मुळे आणि मंगला अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागड़ीकर यांना शनिवारी रात्री 7:30 वाजता असेच एक पत्र देण्यात आले.

त्या पत्रात राज ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणतात की, अनधिकृत फेरीवाले यांनी मुंबईतील फुटपाथ, रेल्वेमार्ग, स्टेशन परिसर व्यापलेला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा तुमची इच्छाशक्ति महत्वाची ठरते. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही या गंभीर प्रश्नावर निर्णय प्रसासनाच्या बाजूने दिलाय. त्यामुळे फुटपाथ, रस्ते, रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त ठेवणे हे लोकहिताच्या दृष्टीने तुमचे काम असून ते तुम्ही करावे असे आवाहनही ठाकरे यांनी केलेले आहे.

यातील महत्वाचे मुद्दे म्हणजे रेल्वे पादचारी पुलांवर फेरी वाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. रेल्वे स्थानक आणि पालिका मंडईच्या 150 मीटर परिसर, शाळा, धार्मिक स्थळे आणि रुग्णालय येथील 100 मीटर परिसर येथेही व्यवसाय करता येणार नाही. त्यांना पालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करता येईल. त्या व्यतिरिक्त कोठेही व्यवसाय करता अनुमती देता येणार नाही. या सर्व गोष्टींची अंमल बजावणी करणे प्रशासन आणि पोलिसांच्या कडून होणे अपेक्षित आहे. आम्हाला तुमच्याशी संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आली का? अनधिकृत फेरीवांल्यांची बाजू घेऊ नका.त्यांना जनता कंटाळली आहे.कायदा काय सांगतो? आणि न्यायालय काय सांगतेय हे तुमच्या पर्यंत पोहचवीण्या साठी हे पत्र लिहित आहे.तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्याची वेळ माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर  आणु नका अशी विनंतीहि  पुढे राज ठाकरे यांनी केली.

Web Title: marathi news mumbai news Raj Thackray MNS Hawkers zone