...तर कोरेगाव भिमा दंगल झालीच नसती: रावसाहेब कसबे

दिनेश चिलप मराठे
रविवार, 7 जानेवारी 2018

दोन्ही समाजातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी काय करायला पाहिजे या प्रश्नावर कसबे म्हणतात, एकमेकांशी संवाद करावा एकमेकांना समजून घ्यावे. ज्या लोकांनी हे अशा प्रकारचे वाईट कृत्य केले असेल त्याला समाजा पासून अलग पाडावे, शिक्षा करावी.

मुंबई : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास 200 वर्ष झालेली असल्यामुळे त्याला भेट देण्यासाठी पाच लाख नागरिक येणार होती. या साठी वर्षभर नागरिक तयारी करीत होते. हे गृहीत धरून शासनाने तेथे जी सुरक्षा व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केली नाही. त्यामुळे तेथे ती दंगल झाली. त्याचा परिणाम असा झाला की दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले. ही तेढ निर्माण करायचे काम सरकारच्या हलगर्जीपणा मुळे निर्माण झालेले आहे. जर तेथे पुरेसा पोलिस बंदोबस्त असता तर या गोष्टी घडल्या नसत्या आणि 200 वर्षे तेथे हां कार्यक्रम होतोय त्याला कोणीही विरोध केला नाही. या वेळी हे ठरवून लोकांनी केलेले आहे. दोषींवर कड़क कार्रवाई व्हावी अशी मी मागणी करीत आहे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केली.

दोन्ही समाजातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी काय करायला पाहिजे या प्रश्नावर कसबे म्हणतात, एकमेकांशी संवाद करावा एकमेकांना समजून घ्यावे. ज्या लोकांनी हे अशा प्रकारचे वाईट कृत्य केले असेल त्याला समाजा पासून अलग पाडावे, शिक्षा करावी.

शनिवारी 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वातानुकुलित सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता बहारदार शाहीरी पोवाडयांनी कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमापूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, संदीप चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर व आमंत्रित वरिष्ठ पत्रकारांनी
आझाद मैदान येथील चौकात असलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नाम फलकाला पुष्पहार अर्पण करीत वंदन केले. पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ विचारवंत आणि वक्ते रावसाहेब कसबे यांचे हस्ते विविध विषयां संदर्भात सर्वोत्तम बातमीदारी केलेल्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डी.एन.ए. च्या देवश्री भुजबळ (अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार),लेखक सचिन जगदाळे - गुलाबराव पारनेरकर पुस्तक(जय हिंद प्रकाशन पुरस्कार) , पूण्यनगरीचे जयवंत बामणे (कॉं.तु.कु.
सरमळकर स्मृती पुरस्कार),अनुराधा परब(विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार),फर्स्ट पोस्ट पोर्टल चे संजय सावंत (नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार) यांना शाल, श्रीफळ आणि पुरस्कार स्मृती चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

सभागृहात उपस्थीत पत्रकार,पाहुणे आणि पत्रकारितेतील विद्यार्थी यांचेशी संवाद साधताना वक़्ते रावसाहेब कसबे म्हणाले, देशातील सद्य स्थितीतील राजकीय वातावरण, घडणाऱ्या गोष्टी, प्रवासा दरम्यान प्रतिष्ठित सभ्यतेची व्याख्या आणि  आपण जगतो का? या जगभर अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नावर केलेले मार्मिक भाष्य  आणि त्यांना एका शालेय विद्यार्थ्याने दिलेले मार्मिक उत्तर' आपण जगतो का? कारण आपल्याला मरण येत नाही म्हणून. या अशा अनेक गोष्टी कथन करताना दुसऱ्या महायुद्धतील एक प्रसंग सांगितला.

एखाद्या भाषेत एखाद्या शब्दाचे परस्पर विरुद्ध अर्थ निघतात त्याचा योग्य अर्थ न घेतल्यास किती वाईट परिणाम होताता ते सांगताना कसबे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धात एका बाजूला दोस्त राष्ट्रे होती तर दुसऱ्या बाजूला फेसिस्ट राष्ट्रे होती. अमेरिकेकडून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांच्या उद्ध्वस्त होण्यामागे एका पत्रकाराने चुकीच्या घेतलेल्या अर्थाच्या वार्तांकन कारणीभुत ठरले. त्याचे झाले असे की या महायुद्धात जपान मेटाकुटिस आला. तिथल्या राजाने प्रेस कॉन्फरन्स बोलाविली. एका पत्रकाराने प्रश्न केला की या युद्धात तुमचे धोरण काय आहे?
त्यावर जपानचे राजे म्हणाले की,"वी हैवे अडोप्टेड पॉलिसी ऑफ़ मोकोसाकुसुक .
या वाक्यांचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ मी तुमची अजिबात पर्वा करीत नाही असा तर दुसरा अर्थ होतो की आम्ही महायुद्धातुन माघार घेण्याचा अतिशय गांभीर्याने विचार करीत आहोत. त्या पत्रकाराने पहिला अर्थ घेत गडबड़ करीत बातमी दिली आणि अमेरिकेने याची गंभीर दखल घेत जपानच्या हिरोशिमा नागासाकिवर अणुबॉम्ब टाकित दोन्ही शहरे उद्ध्वस्त केली. या घटनेनंतर जपानच्या राजाने अमेरिकेला म्हटले की आम्ही कालच काकुळतीने या बाबत म्हटले होते की आम्ही युद्धातुन गांभीर्याने माघार घ्यायचा विचार करतोय आणि तुम्ही आमच्यावर बॉम्ब टाकले. एका पत्रकाराच्या गड़बड़ीत केलेल्या वार्तांकनामुळे हे घडले.या बाबतीत पत्रकारांनी सजग असावे.

Web Title: Marathi news Mumbai news Raosaheb Kasbe statement on Bhima Koregaon