कुणबी समाजाला सभापती पद हे खासदारांचे मोठेपण

दीपक हीरे
बुधवार, 10 जानेवारी 2018

वज्रेश्वरी : भिवंडी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामधे भाजपतर्फे सभापतीपदी अंबाड़ी येथील रवीना जाधव यांची यांचे नाव सुचवल्याने व त्या निवडून आल्याने आमच्या विभागला खासदार कपिल पाटील यांनी न्याय दिला आता या परिसराच्या विकासाला चालाना मिळेल असे मत भिवंडी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती रविना जाधव यांनी व्यक्त केले.

अंबाडी येथे आज झालेल्या स्वागत समारंभमधे त्या बोलत होत्या. गेल्या दहा वर्षापासून या भागातील कुणबी समाजाची व्यक्ती सभापती या पदावर आजपर्यंत कुठल्याही पक्षानी दिली नाही, मात्र खासदार कपिल पाटील यांनी यावेळी झालेल्या निवडणुकीत कुणबी समाजाची व्यक्ती सभापतीपदी दिल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आज अंबाड़ी येथे भाजपच्या कार्यालयात मोठा जल्लोष करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या वेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव, शांताराम पाटील, रवींद्र जाधव, कुंदन पाटील, अंकुश तनपुरे, दशरथ पाटील यांच्यासह अनेक भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाड़ी परिसरातील जनतेला न्याय मिळाला असून या परिसरातील विविध विकास कामे मार्गी लागतील व जनतेचे प्रश्न त्यासह शेतकऱ्यांच्या समस्या प्राध्यानाने सोडविल्या जातील असे सभापती रवीना जाधव यांनी सांगितले. यावेळी समाजातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Marathi news mumbai news ravina jadhav