नोकरभरतीच्या व्हॉट्‌सऍपवरील जाहिराती फसव्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मुंबई : व्हॉट्‌सऍपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या 10 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन विविध पदांच्या भरतीबाबत फसव्या जाहिराती व्हायरल होत आहेत. अशी कोणतीही जाहिरात विभागाने दिली नाही. तरी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे आणि आपली फसगत होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. 

विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट-ड वर्गातील लिपिक-34, सहायक रोखपाल-22, रोखपाल-10, लेखापाल-6, गोपनीय लिपिक-19, देयक लेखापाल-14, शिपाई-58, वाहनचालक-34, नाईक-31 अशी 228 पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात व्हायरल होत आहे. जाहिरातीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-अपमु-2917/प्र.क्र.44/19अ,दि.10 जानेवारी 2018 नमूद केलेले आहे.

तसेच जाहिरातीखाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम अध्यक्ष निवड समिती तथा उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई असे दाखविले आहे.

मंत्रालयातील बऱ्याच विभागांकडून, शासकीय कर्मचारी व जनतेकडून दूरध्वनीवरून ही जाहिरात खरी आहे काय, याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा होत आहे. प्रत्यक्षात व्हॉट्‌सऍपवर फिरणारी जाहिरात फसवी असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशाप्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही.

जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. अशी जाहिरात शासनाच्या विभागाकडून दिली जात नाही. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे सामान्य प्रशासन विभाग व त्या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील 195 अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा शासन निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: marathi news mumbai news Recruitment Advertisements on WhatsApp