32 वर्षांनंतर दुर्लक्षित भारत मातेच्या शिल्पाच्या साक्षीने प्रजासत्ताक दिन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

उल्हासनगर : गेल्या 32 वर्षांपासून दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या व कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या भारतमातेच्या शिल्पाची नव्याने रंगरंगोटी करून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी या शिल्पाला तब्बल 32 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली.

1985 मध्ये उल्हासनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रल्हाद अडवाणी असताना त्यांनी बोट क्लब हे नयनरम्य उद्यान विकसित केले होते. मात्र, काळाच्या ओघात ते दुर्लक्षित होऊन त्याठिकाणी कचऱ्याची डम्पिंग सुरू झाली. 

या उद्यानातील भारत माता, महाराज महाराणा प्रताप, राम लक्ष्मण, झाशीची राणी आदी शिल्प अर्ध्यापेक्षा अधिक घाणीत गाडली गेली. ही बाब कायद्याने वागा लोकचळवळीचे सर्वेसर्वा राज असरोंडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐरणीवर आणल्यावर महापौर मीना आयलानी, आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपमहापौर जीवन इदनानी, सभागृहनेता जमनादास पुरस्वानी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी बोट क्लबकडे धाव घेऊन उद्यानाची पाहणी केली.

आयुक्तांनी तातडीने साफसफाईचे आदेश दिले.भारतमातेच्या शिल्पांसह सर्वच शिल्पांची रंगरंगोटी करण्यात आल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, दिलीप गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भरत गंगोत्री, सतरामदास जेसवानी, भाजपचे मोहन कंडारे, एसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटच्या प्रमुख रीना मिश्रा, दुबे , मनसेचे सचिन कदम,संजय घुगे,प्रदिप गोडसे, दिलीप थोरात, बंडू देशमुख, मनोज शेलार, बाळा गुंजाळ, मैनुद्दीन शेख आदींच्या उपस्थितीत भारतमातेच्या शिल्पाच्या साक्षीने प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी धनंजय बोडारे यांनी बोट क्लब उद्यानाला विकसित करण्यासाठी विरोधी पक्षनेते निधीतून निधी देणार असल्याचे जाहीर केले. राज असरोंडकर यांनी शहराला असलेली उद्यानाची गरज आणि त्यावर असलेला भूमाफियांचा डोळा याबाबत तिखट मत वक्त केले. सत्ताधारी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास श्रमदानातून बोट क्लब उद्यान विकसित करू असेही असरोंडकर यांनी सांगितले.

Web Title: Marathi News Mumbai News Republic Day Celebration