कल्याण - शहाड पुलावर ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

रविंद्र खरात
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड पुलावर आज मंगळवारी (ता. 27) दुपारी अडीच पावणे तीनच्या सुमारास एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने तब्बल एक ते सव्वा एक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालक सहित नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. 

कल्याण : कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड पुलावर आज मंगळवारी (ता. 27) दुपारी अडीच पावणे तीनच्या सुमारास एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने तब्बल एक ते सव्वा एक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालक सहित नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. 

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड पुलावर आज दुपारी अडीच पावणे तीनच्या सुमारास एक माल वाहतूक सिमेंटचा ट्रक अचानक बंद पडल्याने शहाड, कल्याण मुरबाड रोड, कल्याण बिर्ला कॉलेज रोड आणि कल्याण मोहना रोड वर लांब लचक वाहनांच्या रांगा लागल्याने तब्बल एक ते सव्वा एक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालकांसहित नागरीकांना चांगलाच त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आणि त्यांचे पथक तसेच उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र लांबलचक वाहनांची रांग लागल्याने चांगलीच कोंडी झाली ती दूर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. तब्बल एक ते सव्वा तासाने तो ट्रक दूर झाल्यावर वाहन चालक, नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

अडीच पावणे तीनच्या सुमारास ट्रक बंद पडल्याची सूचना मिळताच उल्हासनगर आणि कल्याण वाहतूक पोलिसांनी तो ट्रक क्रेन च्या सहाय्याने बाजूला सारला मात्र तब्बल सव्वा तास त्या परिसरात वाहतूक ठप्प होती अशी माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Web Title: Marathi news mumbai news road traffic kalyan