अघोषित शाळा घोषित करण्यासाठी कृती समितीचे अांदोलन सुरुच

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : अघोषित शाळा घोषित करण्यासाठी कृती समितीचे अांदोलन सुरुच! अंदोलन तीव्र करण्यासाठी खाजगी शिक्षक संघटनेचा सक्रिय सहभाग! अांदोलनास राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली.

अघोषित शाळा घोषित करण्यासाठी अाझाद मैदानावर गेली सोळा दिवस अंदोलन सुरु अाहे. नागपूर हिवाळी अधिवेशन २०१७ मध्ये दिलेल्या अाश्वासनानुसार १ व २ जुलैच्या शाळांना अनुदान मंजुर केले अाहे. तसेच उर्वरीत अघोषित शाळांना घोषित करुन अनुदान सुरु करण्याची मागणी अाहे. त्यासाठी अांदोलन तीव्र करण्यासाठी राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा सक्रिय सहभाग अाहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे  यांनी अांदोलनास भेट दिली. उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे. अाज मी लगेच मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन अधिवेशनात अघोषित शाळा घोषित करणेबाबत बोलतो, असे राणे यांनी प्रतिपादन केले.

परंतु जोपर्यंत शिक्षण मंत्री महोदय सभागृहात प्रचलित टप्प्यानुसार अनुदान सुरु करत नाही व अघोषित शाळांना घोषित करत नाही तोपर्यंत अाझाद मैदानावर सुरु असलेले आमरण उपोषण सुरुच राहील. अशी भूमिका जगदाळे सर व यांनी घेतली. या प्रसंगी खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी विषयाचे गांभिर्य लक्षात अाणून देत चर्चा केली. राज्य संघटक तथा रात्र शाळा समन्वयक  भानुदास शिंदे व सुधीर वऱ्हाडी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Web Title: Marathi news mumbai news schools agitation