ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे - के.पी. रघुवंशी

संजीत वायंगणकर
गुरुवार, 1 मार्च 2018

डोंबिवली : सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते. 

डोंबिवली : सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते. 

दरवर्षी प्रमाणेच  अनेक समाजसेवी संस्थांबरोबर विशेषतः मधूमेहींसंदर्भात कार्य करणारे डॉ. अरुण पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलच्या 38 व्या वर्धापन दिनाचेे अौचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना रघुवंशी पुढे म्हणाले,  शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी योगा, व्यायाम गरजेचा आहे. मानसिक स्वास्थासाठी आवडत्या छंदात मन रमवावे. तरुणपिढीसोबत समन्वय साधतांना तुलना करु नये असा सल्लाही रघुवंशी यांनी दिला. 

कायदेतज्ज्ञ शिरीष देशपांडे यांनी उपस्थितांना भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमानकाळ आनंदामध्ये जगा असा सल्ला दिला. यावेळी उत्कृष्ट पेन्शनर म्हणून श्रीधर राजाराम भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट पेन्शनर दांम्पत्य म्हणून शरद नारायण भिडे आणि जया भिडे यांचा गौरव करण्यात आला. गेली आठ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षीपासून समाजसेविका ज्योती शंकर साठवणे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट चतुरस्त्र व्यक्तीमत्व पुरस्कारही देण्यात येत आहे.  यावर्षीचा प्रथम पुरस्कार ज्योती गुप्ता यांना देण्यात आला.

यावेळी श्रृती शिंदेहिने दिव्यांसह योगाची प्रात्यक्षिके सादर केली. प्रविण मानकर, पल्लवी शेट्टी, शांताराम मनवे आदींचा, तसेच सहा. पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गायक गिरीष डोईफोडे यांनी गाणे सादर केले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश देशपांडे, मनिष चितळे, दिलीप खन्ना, सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  डॉ. अरुण पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  गिरीष डोईफोडे आणि अलोक काटदरे यांच्या गाण्यांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी दीपा बापट यांनी विशेष परिश्रम घेतले.   

Web Title: Marathi news mumbai news senior citizens mental health is important