जानकीदेवी बजाज पुरस्काराच्या मानकरी ठरल्या शमशाद बेगम

mumbai
mumbai

मुंबादेवी : त्या राहतात छत्तीसगढ़ राज्यातील गुंडरदेही गावात त्यांनी आपल्या गावातूनच जन कल्याणकारी योजनांची सुरुवात केली.गावातील आणि तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो दारुबंदी आणि बालिका सुरक्षेचा.यावर सखोल अभ्यास करुन त्यांनी पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता ख़ास गाव पातळीवरील शाळा कॉलेज स्तरांवरील विद्यार्थीनी आणि  महिलांना संघटीत करुन सुरक्षा करिता 'महिला कमाण्डो' पथक तैय्यार केले.

या बाबतीत पोलिसांना खबर मिळताच जिल्हा पोलिस प्रमुखांनी प्रत्यक्ष भेट देऊन महिलांच्या पथकाची भेट घेऊन त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले आणि आश्चर्य घडले.गाव पातळीवरील सर्व बेकायदेशीर धंधे करणा-यांचे ढाबे दणाणले.प्रश्न दोघांच्याही आस्तित्वाचा होता.एका बाजूने महिलांचे कमाण्डो पथक यूनिफार्म म्हणजेच नेहमीची वापरातील साडी हातात लाठी आणि डोक्यावर लाल रंगाची सैनिकी गोल टोपी.तर दुसऱ्या बाजूने दारु धंद्याचे ठेकेदार, गावगुंड त्यांच्यासह तरबेज दबंग राजकारणी.संघर्ष उभा पेटला आणि लढाई झाली.त्यात सगळ्या वाईटावर, 
असत्यावर सत्याची जीत झाली. उभी बाटली आडवी झाली. दारुचे धंधे उध्वस्त झाले.काहींणा लाठीकाठीचा प्रसाद डोक्यापासून ते पाया पर्यन्त चोप स्वरुपात लाभला.त्यांनी हार मानली आणि ठेकेदारांसह गावातून  पळ काढला.

या रणरागिनींचा पराक्रम हाहा म्हणता जिल्हयात आणि तेथून राज्यात पसरला.या सर्व लढाईचे नेतृत्व अत्यंत शांतपणे करीत होत्या त्या सहयोगी जन कल्याण समितीच्या अध्यक्षा शमशाद बेगम. त्यांच्या कड़े पाहुन दुर्गा सप्तशतीतील देवी स्तुतीमय श्लोक
या देवी सर्व भुतेशु शक्ति रूपेण संस्थिता l नमस्तस्ये नमोनमः ll

त्यांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वोत्तम पाऊल उचलले घरेलु हिंसा ना  कायमचा पायबंद घालण्यासाठी विशेष मोहीम राबवत स्त्रीयांना सन्मान प्राप्त करुन देण्यास घरातूनच प्रारंभ करुन दिला.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास महिलांमध्ये जागरूता निर्माण करीत स्त्री जन्मदरात वाढ होण्यास मदत मिळवून दिली. व्याजाने पैसे देऊन पिळवणूक करणाऱ्या सावकारी प्रथा बंद केल्या.त्यांनी महिलांना आवाहन करीत घराघरात महिला कमांडो निर्माण केल्या.त्यांच्या मार्फत नशा बंदी,हुंडा बंदी,बाल विवाह,अंध विश्वास,जादूटोना आदिंवर प्रहार करीत त्या बंद केल्या.स्त्री शिक्षण आणि संरक्षण,आर्थिक सुबलता,रात्र कालीन ग्राम गस्ती पथक,ग्राम कल्याण विविध योजना शासना कडून राबविल्या.त्यांच्या सामाजिक कार्याचा भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरव केला.इंडियन मर्चेन्ट चेम्बर्स या वर्षीचा 25 व्या आयएमजी लेडीज विंग जानकीदेवी बजाज पुरस्कार 2017 च्या त्या मानकरी ठरल्या. त्यांना आज हा पुरस्कार जीएआयएन च्या अध्यक्षा विनीता बाली यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.अमित चंद्र,अंशु गुप्ता, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर,प्रदीप शाह,डॉ.पूर्णिमा आडवाणी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com