गुढीपाडव्यानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

पूनम कुलकर्णी 
गुरुवार, 15 मार्च 2018

गुढीपाडवाचे औचित्य साधत लोकप्रिय मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक तयार केला आहे. 

मुंबई- गुढीपाडवा म्हटलं की चिभेवर रेंगाळू लागते ती श्रीखंडाची चव. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गुढीपाडवाचे औचित्य साधत लोकप्रिय मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक तयार केला आहे. 

cake

पारंपारिक रेसिपीला मॉर्डन लुक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे. श्रीखंड आणि चीज याचे मिश्रण असलेला हा केक खवय्यांची पसंतीस उतरेल असा विश्वास मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी व्यक्त केला. खवय्यांना या केकची चव अंधेरी पश्चिम येथील इप्रेसा हॉटेलात चाखता येणार आहे.

yummy cake

Web Title: Marathi news mumbai news shrikhand cheese cake gudhi padwa