मला खोट्या प्रकरणात अडकवले : पंडियन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पंडियन जेव्हा गुप्तचर विभागामध्ये होते, त्या वेळी त्यांनी दाऊद आणि पाकिस्तानमधील आयएसआयविरोधात कारवाई सुरू केली होती. तरीही पंडियन यांच्याविरोधात सीबीआयने खोटे पुरावे जमा करून त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवले, असा दावा पंडियन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला; मात्र सीबीआयने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही माझ्याविरोधात ठोस पुरावा दाखल होऊ शकला नाही, असेही पंडियन यांनी सांगितले.

मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात माझा सहभाग नसून सीबीआयने मला खोट्या प्रकरणात अडकवले, असा दावा या खटल्यातील दोषमुक्त पोलिस अधिकारी राजकुमार पंडियन यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. सोहराबुद्दीन बनावट चकमकीशी संबंधित याचिकेची सुनावणी न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सुरू आहे. पंडियन यांच्या वतीने ऍड. महेश जेठमलानी यांनी शनिवारी (ता. 24) युक्तिवाद केला.

पंडियन जेव्हा गुप्तचर विभागामध्ये होते, त्या वेळी त्यांनी दाऊद आणि पाकिस्तानमधील आयएसआयविरोधात कारवाई सुरू केली होती. तरीही पंडियन यांच्याविरोधात सीबीआयने खोटे पुरावे जमा करून त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवले, असा दावा पंडियन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला; मात्र सीबीआयने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही माझ्याविरोधात ठोस पुरावा दाखल होऊ शकला नाही, असेही पंडियन यांनी सांगितले.

सीबीआयने एकूण 38 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यापैकी 15 जणांना न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी दोषमुक्त केले आहे. 

Web Title: Marathi News Mumbai News Soharabuddin Encounter Rajkumar Pandian